Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत दयाबेनचं कमबॅक; 'गोकुळधाम'चे रहिवासी दिमाखात करणार दिशा वकानीचं स्वागत
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत आता दयाबेनचं कमबॅक होणार आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या 15 वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. 2008 मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला असून आजही या मालिकेची चांगलीच क्रेझ आहे. मालिकेच्या कथानकापासून स्टार कास्टपर्यंत सर्वच गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता या मालिकेत दयाबेनची (Dayaben) एन्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिकेला रामराम केला आहे. तर अनेक कलाकारांनी मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोपही केले आहेत. त्यामुळे अनेक कलाकारांच्या रिप्लेसमेंटही झाल्या आहेत. पण अजूनही दयाबेनची जागा कोणत्याही अभिनेत्रीला घेता आलेली नाही. अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) या मालिकेत दयाबेनच्या भूमिकेत झळकली होती.
View this post on Instagram
अभिनेत्री दिशा वकानीने प्रेग्नेंसीच्या कारणाने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेतला होता. पण मॅटरनिटी लिव्ह संपल्यानंतरही दिशा वकानी मालिकेत परतली नाही. दिशाचे चाहते त्यांच्या लाडक्या दयाबेनची खूप वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी दिशाने मालिका सोडल्याची चर्चा रंगली होती. गेल्या काही दिवसांपासून मालिकेचे निर्माते दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेत आहेत. पण आता दिशा वकानी मालिकेत कमबॅक करत असल्याचं समोर आलं आहे.
दिवाळीत दयाबेनचं कमबॅक!
पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री दिशा वकानी येत्या दिवाळीत 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत कमबॅक करू शकते. दिशा मालिकेत कमबॅक करत असल्याने तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पण अद्याप या वृत्तांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही".
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत सध्या जेठालालला दयाबेनची खूप आठवण येत आहे. त्याला दयाला पुन्हा एकदा गोकुळधाममध्ये पाहायचं आहे. जेठालाल दया परतण्याबाबत ठाम आहे. यावर सुंदरने दया लवकरच गोकुळधाममध्ये दिसणार असल्याची घोषणा केली आहे.
संबंधित बातम्या