Swarajya Saudamini Tararani : 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' (Swarajya Saudamini Tararani) मालिकेच्या कलाकारांनी मालिकेच्या सेटवर शिवजयंती साजरी केली आहे. दांडपट्टा, काठीच्या खेळांसारखे मर्दानी खेळ यावेळी लहानग्यांनी सादर केले. 


अनेक मराठी मालिका शिवरायांचा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. येणाऱ्या प्रत्येक पिढीपर्यंत शिवरायांचा इतिहास पोहचवणं खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळेच 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेच्या सेटवरदेखील शिवजयंती साजरी केली आहे. तसेच शिवजयंती निमित्त मालिकेचा विशेष भाग होणार आहे.





'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. लवकरच या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे दिसणार आहे. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. यासंदर्भात माहिती देत अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर लिहिले आहे,"जवळपास सहा महिन्यांनंतर योग आला पुन्हा ते गारूड अनुभवण्याचा, पुन्हा नतमस्तक होण्याचा, पुन्हा पडद्यावर 'महाराज' साकारण्याचा! स्वराज्य सौदामिनी ताराराणी".


संबंधित बातम्या


Pawankhind : 'पावनखिंड' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, लागला हाऊसफुल्लचा बोर्ड


Gangubai Kathiawadi : 'गंगू येत आहे पुढच्या आठवड्यात', बहुचर्चित 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित


Ser Sivraj Hai : ‘शिवजयंती’निमित्ताने खास भेट, महाराजांच्या वैशिष्ट्यांचे गुणगान करणारे 'सेर सिवराज है' रसिकांच्या भेटीला!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha