Madhuri Dixit Kapil Sharma Show Video : बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितची (Madhuri Dixit)'द फेम गेम' ही वेबसीरिज लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून माधुरी ओटीटीवर पदार्पण करणार आहे. या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी माधुरी 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसून येणार आहे. दरम्यान कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या विनोदी शैलीत माधुरीच्या नवऱ्याची खिल्ली उडवताना दिसून येईल.


'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिल शर्मा त्याच्या विनोदी शैलीत माधुरी दीक्षितला डॉ. श्रीराम नेनेंबद्दल विचारताना दिसणार आहे. कपिल शर्मा विचारतो,"हृदयाचे ठोके सांभाळणे सामान्य माणसाला जमत नाही. म्हणूनच तुम्ही हृदयाच्या डॉक्टरसोबत लग्न केले आहे. डॉक्टर नेनेंनी जेव्हा तुमचा हात हातात घेतला तेव्हा ते माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणाले की त्यांच्या हृदयाची धडधड जास्त वाढायला लागली त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरांना बोलवण्याची गरज लागली". कपिल शर्माचे हे बोलणे ऐकून माधुरी दीक्षित हसायला लागते.






'द कपिल शर्मा शो'चा आगामी एपिसोड खूप धमाकेदार असणार आहे. या कार्यक्रमात माधुरी तिच्या आयुष्यातील अनेक किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करताना दिसणार आहे. 


संबंधित बातम्या


DIDLM 5 : 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर 5' चा प्रोमो रिलीज, मौनी रॉयसह 'ही' अभिनेत्री असणार परिक्षक


Farhan Shibani Wedding: ना लग्न ना निकाह, ‘या’ खास पद्धतीने फरहान-शिबानी बांधणार साताजन्माची गाठ!


Vaishali Made : ‘काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका!’, गायिका वैशाली माडेची धक्कादायक पोस्ट


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha