Pawankhind : स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा आज 'पावनखिंड' (Pawankhind) सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'पावनखिंड' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आज बहुप्रतिक्षित 'पावनखिंड' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बऱ्याच सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. 

Continues below advertisement


सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागल्याने अनेक सिनेप्रेमींना आज सिनेमा पाहता आला नाही. ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कोल्हापूर, नाशिकसारख्या ठिकाणी सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. या सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी सिनेसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 


स्वराज्याची सेवा, राजांशी निष्ठा, गनिमांचा खात्मा, मृत्यू समोर उभा ठाकला तरी केली जाणारी वचनपूर्तता हे सर्व गुण शिवरायांच्या मावळ्यांच्या रक्तात अक्षरश: भिनले होते. त्याच पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास 'पावनखिंड' सिनेमात पाहायला मिळणार आहे. अभिनेते अजय पूरकर यांनी या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. 


'पावनखिंड' सिनेमाचे लेखक-दिग्दर्शन अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले,  हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या 'पावनखिंड' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.


संबंधित बातम्या


Ser Sivraj Hai : ‘शिवजयंती’निमित्ताने खास भेट, महाराजांच्या वैशिष्ट्यांचे गुणगान करणारे 'सेर सिवराज है' रसिकांच्या भेटीला!  


DIDLM 5 : 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर 5' चा प्रोमो रिलीज, मौनी रॉयसह 'ही' अभिनेत्री असणार परिक्षक


Vaishali Made : ‘काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका!’, गायिका वैशाली माडेची धक्कादायक पोस्ट


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha