Gangubai Kathiawadi New Poster :  संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) प्रमुख भूमिकेत आहे. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.





आलिया भट्टने 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत तिने लिहिले आहे,"उद्याच्या पेपरमध्ये लिहा, गंगू येत आहे पुढच्या आठवड्यात". पोस्टरमधील आलियाच्या लूकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर 72 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे.






'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाची कथा काय आहे?
आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा बायोग्राफिकल ड्रामा आहे. आलिया भट्ट या चित्रपटात 'गंगूबाई'ची भूमिका साकारत आहे. गंगूबाईला तिच्याच नवऱ्याने 500 रुपयांना विकले होते. या चित्रपटाची कथा लेखक हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. गंगूबाईंच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूला स्पर्श करण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे. एक सामान्य मुलगी कामाठीपुराची क्वीन कशी बनते, हे सर्व या सिनेमात पाहायला मिळेल.


संबंधित बातम्या


Pawankhind : 'पावनखिंड' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, लागला हाऊसफुल्लचा बोर्ड


Ser Sivraj Hai : ‘शिवजयंती’निमित्ताने खास भेट, महाराजांच्या वैशिष्ट्यांचे गुणगान करणारे 'सेर सिवराज है' रसिकांच्या भेटीला! 


DIDLM 5 : 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर 5' चा प्रोमो रिलीज, मौनी रॉयसह 'ही' अभिनेत्री असणार परिक्षक


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha