एक्स्प्लोर

Marathi Serial Sukh Kalaley Spruha Joshi : नव्या रुपातील मिथिला येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'सुख कळले' मालिका नव्या वळणावर

Marathi Serial Sukh Kalaley Spruha Joshi : 'सुख कळले' या मालिकेचे कथानकही नव्या वळणावर आले आहे. मालिकेतील मुख्य व्यक्तीरेखा मिथिला आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Marathi Serial Sukh Kalaley Spruha Joshi : छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकात अनेक वळण येत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकेच्या कथानकात बदल होत आहेत. आता, 'कलर्स मराठी'वरील 'सुख कळले' (Sukh Kalaley) या मालिकेचे कथानकही नव्या वळणावर आले आहे. मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) मुख्य व्यक्तीरेखा मिथिला आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अनेक संकटांच्या आव्हानांना सामोरे जाताना स्त्रिया खचून जाता त्यांना खंबीरपणे सामोरे जातात. स्त्रियांच्या या खंबीरतेवर भाष्य करणाऱ्या काही मालिका आहेत. सध्या कलर्स मराठीवर सुरू असलेली 'सुख कळले' ही मालिकादेखील याच पठडीतील आहे.  आजच्या युगातील मल्टीटास्किंग करणाऱ्या स्त्रीला प्रतिनिधित्व करणारी मिथिला प्रेक्षकांना आता 'सुख कळले' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 

'सुख कळले' या मालिकेतील नव्या मिथिलाबद्दल बोलताना स्पृहा जोशी म्हणाली,"मिथिला या व्यक्तीरेखेचा आताचा प्रवास खूप मनोरंजक आहे. बऱ्याचदा आपल्याला आसपास अनेक आत्मविश्वासू स्त्रिया दिसतात. ज्यांची स्वत:ची मते असतात. आपल्या कुटुंबीयांसाठीसुद्धा त्या तितक्याच खंबीरपणे उभ्या राहतात. काही वेळेस अशा व्यक्तींच्या आयुष्यात अचानक एखादी घटना घडते आणि त्यांना मुळापासून हादरवून टाकते. त्यामुळे त्यांचा सगळा आत्मविश्वास डळमळतो आणि त्या व्यक्ती कोलमडून जातात. अशा व्यक्तींना कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळतो आणि ते त्याच्या आधारावर पुन्हा नव्याने उभ्या राहतात, असे स्पृहाने आपल्या नव्या व्यक्तीरेखेबाबत बोलताना सांगितले. 

स्पृहाने पुढे सांगितले की, "मिथिलाचा आता सुरू असलेला प्रवासदेखील याच पद्धतीचा आहे. आता तिच्या नव्या प्रवासाची सुरुवात होणार आहे. आता ती हरवलेल्या स्वत:ला शोधतेय, तिचा आत्मविश्वासही शोधतेय. एक नव्या जिद्दीने ती हा विचार करतेय की, माधवसोबतच्या अन्यायावर आपल्याला कशी मात करता येईल. त्याला न्याय कसा मिळवून देऊ शकतो. या सगळ्या प्रवासात तिच्या व्यक्तीमत्त्वातही बदल होतो. तिला एक नवं जग खुणावतंय आणि त्या नव्या विश्वाचा भाग होऊ पाहतेय. नव्याचा शोध घेणारी ही मिथिला आहे. त्यामुळे राहणीमानासह तिच्या अनेक गोष्टींत बदल होतो. मिथिला आता स्वत:वर जास्तीत जास्त प्रेम करायला लागली असल्याचे तिने सांगितले. 

स्वतंत्र विचारांची, आत्मविश्वासू, स्पष्टवक्ती, आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करणारी नव्या रुपातील मिथिला प्रेक्षकांच्या भेटीला 15 ऑगस्टनंतरच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget