एक्स्प्लोर

Sidharth Shukla Death : बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

Sidharth Shukla Death : हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. हृदय विकाराचा झटक्यामुळं सिद्धार्थचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Sidharth Shukla Death : बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचं निधन झालं आहे. परंतु मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हृदय विकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खंर कारण कळू शकेल. मुंबईच्या कूपर रूग्णालयाने तसेच मुंबई पोलिसांनी सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता. याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्यानं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. सिद्धार्थच्या निधनामुळं टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते शोकाकूल आहेत. 

सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला असं बोललं जात असतं ती शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असं सांगितलं जात आहे. सिद्धार्थ शुक्ला 40 वर्षांचा होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थला हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधुमधून मिळाली. त्यानंतर सिद्धार्थनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता. सिद्धार्थच्या निधनाची बातमी मिळताच मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

बिग बॉस 13 मुळे सिद्धार्थ पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आला. त्यांची आणि पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. दोघ काही दिवसांपूर्वी एकत्र बिग बॉस ओटीटीवर दिसून आले होते. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike On CM Fadnavis: 'त्यांचं स्किट बघून जाईन...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा
'त्यांचं स्किट बघून जाईन...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा
Harshad Chopda in Lock up2: 'मी तिच्यासाठी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...', गर्लफ्रेंडकडून धोका, प्रसिद्ध TV अभिनेत्याने उचललं होतं टोकाचं पाऊल, शोमध्ये म्हणाला...
'मी तिच्यासाठी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...', गर्लफ्रेंडकडून धोका, प्रसिद्ध TV अभिनेत्याने उचललं होतं टोकाचं पाऊल, शोमध्ये म्हणाला...
Ek Hota Malin Trailer: निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
Shilpa Shinde Viral Video Controversy: 'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget