एक्स्प्लोर
अभिनेत्री श्वेता तिवारी दुसऱ्यांदा आई बनली!
मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी दुसऱ्यांदा आई बनली आहे. श्वेताने 27 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या सांताक्रूझमधील सूर्य चाईल्ड केअर हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला.
श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांचं हे पहिलंच अपत्य आहे. आम्ही अतिशय आनंदी आहोत. तुमच्या शुभेच्छांसाठी आभार. आम्हाला मुलगा झाला आहे. त्याचा जन्म 27 नोव्हेंबर रोजी झाला. बाळ सुदृढ आहे. श्वेता आणि बाळा शनिवारी घरी आणणार आहोत. बाळाचं नाव अजून ठरवलेलं नाही, असं अभिनव कोहलीने सांगितलं.
श्वेता तिवारीला 15 वर्षांची मुलगी पलक ही मुलगीही आहे. पलक ही श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. परंतु राजा आणि तिचे संबंध फारसे चांगले नव्हते. अखेर लग्नाच्या 9 वर्षांनंतर 2007 मध्ये तिने राजापासून घटस्फोट घेतला.
यानंतर 2013 मध्ये श्वेताने अभिनव कोहलीसोबत लग्न केलं. काही दिवसांपूर्वीच श्वेताने इन्स्टाग्रामवर बेबी बंपसह फोटो पोस्ट केले होते.
'कसौटी जिंदगी की', 'कॉमेडी सर्कस का नया दौर', 'बेगूसराय' यांसारख्या मालिकांसाठी श्वेता तिवारी ओळखली जाते. याशिवाय ती 'बिग बॉस सीजन 4'ची विजेती होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
करमणूक
परभणी
जळगाव
Advertisement