'साराभाई' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीवर भररस्त्यात हल्ला
मुंबईतील अंधेरी भागात भरदिवसा प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुलीच्या कारची काच फोडण्यात आली.
रुपालीच्या मुलाने तिचा मोबाईल घेतला, त्याला थांबवताना ब्रेकवरुन तिचा पाय सरकला आणि गाडी थोडीशी पुढे गेली. त्यामुळे तिच्या कारचा धक्का एका बाईकला लागला. यामुळे बाईकवार संतापले आणि त्या दोघांनी रुपालीला शिवीगाळ करायला सुरुवात केली. 'फार काही झालेलं नाही. इतकी काय ओव्हरअॅक्टिंग करता?' असं आपण म्हणाल्याचं रुपाली सांगते. बाईकस्वारांची माफी मागितल्याचंही ती म्हणाली. 'ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एकाने माझ्या गाडीच्या काचेवर इतक्या जोराने मारलं की काच फुटली.' असंही पुढे रुपालीने सांगितलं.For the first time in my life I experienced #RoadRage!2 #Hooligans on a bike smashed my car window and kept hurling abuses at me in front of my 5yr old son!I dint note down the number or even take their pics-my only agenda was to get my petrified child n his caretaker to safety! pic.twitter.com/YJVZYhIDzy
— Rupali Ganguli (@TheRupali) August 4, 2018
गाडीची काच लागल्यामुळे रुपालीच्या हातातून रक्त येत होतं. 'इतका राग कशाला आलाय?' असं मी विचारताच तो मागच्या बाजूला गेला. कदाचित गाडीची मागची काच फोडण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण मी तात्काळ गाडी पुढे नेली, असंही रुपालीने सांगितलं. रुपालीने या घटनेची तक्रार जवळच्या पोलिसात केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी दोन्ही आरोपींच्या आईही सोबत होत्या. 'तुम्हीपण एक आई आहात, आमच्या मुलांना माफ करा' असं त्या म्हणाल्याचं रुपाली सांगते. पोलिसांनी आपल्याला मदत केल्यामुळे रुपालीने त्यांचे आभार मानले. मात्र घटनेवेळी सर्व पादचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने 'मुंबई स्पिरीट'वरही तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.These were the guys! The one on the left broke the glass with a punch ! Wish he would put his strength to better use than scaring women and children #RoadRage @MumbaiPolice pic.twitter.com/Kn6GeETjJh
— Rupali Ganguli (@TheRupali) August 4, 2018
#spiritofmumbai does not exist!!!! The people just stood there watching a two women and child being attacked in a car being by two #scums!I was on my way to drop my son to school at 8.20am! They all just stood and saw the #tamasha! Not one person came to help or intervene!! pic.twitter.com/HumDVdFUWt
— Rupali Ganguli (@TheRupali) August 4, 2018
Only one woman on a bike and two women in a rickshaw came later and offered to help us!!! #women!!! Where were the #men ???? @MumbaiPolice #thankyou for doing all that you guys do for this city which has the most #indifferent breed of people !!! pic.twitter.com/KEnVn6CRGH
— Rupali Ganguli (@TheRupali) August 4, 2018