एक्स्प्लोर
Advertisement
सलमान भडकला आणि प्रियांकाला 'बिग बॉस 10'मधून हाकललं
मुंबई : 'बिग बॉस 10' च्या घरातील हा वीकेंड अतिशय रोमांचक होता. सलमान खानने मोठा निर्णय घेत, प्रियांका जग्गाला घरातून बाहेर काढलं. बिग बॉसच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं आहे.
बिग बॉसच्या घरात प्रियांकाचं वर्तन अतिशय वाईट होतं. एवढंच नाही तर ती सलमान सोबतच वाद घालू लागली. 'वीकेंड के वार'मध्ये सलमान कन्टेन्स्टंटसोबत चर्चा करत होता. त्यावेळी बोलताना सलमान बोलला की, प्रियांका फारच आक्रमक आहे आणि घरात सगळ्यांना शिव्या देते.
यावर प्रियांका म्हणाला की, बोलत राहा... आणखी बोलत राहा.... यावर सलमानचा पारा चढला. प्रियांकाला तंबी देत सलमान म्हणाला की, मॅडम, तुझा हा टोन माझ्यासमोर चालणार नाही. यानंतर प्रियांका रडायला लागल्यावर, तुझं हे नाटक माझ्यासमोर चालणार नाही, असं सुनावत सलमानने तिला घर सोडण्यास सांगितलं.
एवढंच नाही तर यापुढे कलर्स चॅनलने प्रियांका जग्गासोबत काम केलं, तर मी कलर्ससोबत काम करणार नाही, असंही सलमानने ठणकावलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement