एक्स्प्लोर
सब टीव्हीचे संस्थापक गौतम अधिकारी यांचं निधन
टीव्ही क्षेत्रातील दिग्गज नाव आणि ‘अधिकारी ब्रदर्स’चे श्री गौतम अधिकारी यांचं आज सकाळी निधन झालं.

मुंबई: टीव्ही क्षेत्रातील दिग्गज नाव आणि ‘अधिकारी ब्रदर्स’चे श्री गौतम अधिकारी यांचं आज सकाळी निधन झालं. ते 67 वर्षांचे होते.
गौतम अधिकारी यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वा अंत्यसंस्कार करण्यात येतील. गौतम अधिकारी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा रवी आणि मुलगी उर्वी आहेत.
गौतम अधिकारी हे नवयुवकांसाठी अनुभवाचं भांडार होते. त्यांनी मराठी टीव्ही मालिकांच्या दिग्दर्शनात रेकॉर्ड केला. सर्वाधिक एपिसोड्सचं दिग्दर्शन करण्याचा विक्रम गौतम अधिकारींनी रचला. त्यामुळेच त्यांचं नाव ‘लिम्का बुक’मध्येही नोंदलं गेलं.
महत्त्वाचं म्हणजे मनोरंजन क्षेत्रातील आघाडीचं नाव असलेल्या हिंदीतील सब टीव्ही या चॅनेलची स्थापना गौतम आणि त्यांचा भाऊ मार्कंड अधिकारी यांनी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
नाशिक
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
