Sa Re Ga Ma Pa 2023 Winner : अल्बर्ट लेप्चा ठरला 'सा रे ग म प 2023'चा विजेता! म्हणाला,"पत्नीच्या पाठिंब्यामुळे जिंकलो"
Sa Re Ga Ma Pa 2023 Winner : गायक अल्बर्ट लेप्चा (Albert Lepcha) 'सा रे ग म प 2023' या लोकप्रिय कार्यक्रमाचा विजेता झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.
Sa Re Ga Ma Pa Winner Albert Kabo Lepcha : 'सा रे ग म प 2023' (Sa Re Ga Ma Pa 2023) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. नुकताच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. गायक अल्बर्ट लेप्चा (Albert Lepcha) या कार्यक्रमाचा विजेता ठरला आहे.
'सा रे ग म प 2023'चा ग्रँड फिनाले खूपच कमाल होता. यंदाचं पर्वही खूप खास ठरलं आहे. हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya), नीती मोहन (Neeti Mohan) आणि अनु मलिक (Anu Malik) या पर्वाचे परिक्षक होते. तर रानिता बनर्जी, अल्बर्ट लेप्चा, सोनिया गॅम्जर, स्नेहा भट्टाचार्य आणि निष्ठा शर्मा हे स्पर्धक या पर्वात अंतिम टप्प्यात आले होते. या सर्व स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. यातून अल्बर्ट लेप्चाने 'सारेगमप 2023'च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
'सा रे ग म प 2023'च्या ट्रॉफीवर अल्बर्ट लेप्चाने कोरलं नाव
अल्बर्ट काबो लेप्चा 'सा रे ग म प 2023'चा विजेता ठरला आहे. 27 वर्षीय अल्बर्ट हा पश्चिम बंगालमध्ये राहणारा आहे. पण सध्या तो कोलकातामध्ये राहतो आहे. अल्बर्ट लेप्चानेने 'सा रे ग म प 2023'ची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. तर निष्ठा शर्मा (Nishtha Sharma) पहिली उपविजेती आणि रनिता बनर्जी (Ranita Banerjee) दुसरी उपविजेती ठरली आहे.
View this post on Instagram
पत्नीच्या पाठिंब्यामुळे जिंकलो : अल्बर्ट लेप्चा
विजेतेपद पटकावल्यानंतर इटाइम्स सोबत बोलताना अल्बर्ट लेप्चा म्हणाला,"सा रे ग म प 2023' हा कार्यक्रम मी जिंकलो असल्याने खूप आनंदी आहे. मी जिंकलो असलो तरी या पर्वातील सर्वच स्पर्धक उत्तम आहेत. उत्कृष्ट गायक आहेत. त्यामुळे तेही विजेते आहेत. 'सा रे ग म प 2023'ची ट्रॉफी मी जिंकेल असं मला कधी वाटलं नव्हतं".
अल्बर्ट काबो लेप्चा 2015 मध्ये पूजासोबत लग्नबंधनात अडकला. त्याबद्दल बोलताना तो म्हणतो,"सा रे ग म प 2023'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर माझ्या कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे. माझ्या पत्नीने मला या संपूर्ण प्रवासात साथ दिली आहे. पत्नी खंबीरपणे मला साथ देत माझ्या पाठिशी उभी होती. 'सारेगमप 2023' या कार्यक्रमात सहभागी व्हावं, अशी माझ्या पत्नीची इच्छा होती. आता हा कार्यक्रम जिंकण पत्नीसाठी स्वप्न साकार होण्यासारखं आहे".
अल्बर्टने 'सा रे ग म प 2023' हे पर्व आपल्या मधूर आवाजाने चांगलच गाजवलं आहे. परिक्षकांनाही त्याने आपल्या आवाजाने थक्क केलं आहे. अल्बर्टचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा देत आहेत.
संबंधित बातम्या