Ramayan: 22 जानेवारीला अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला  'रामायण' या लोकप्रिय मालिकेतील प्रभू श्री रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल (Arun Govil) यांनी तसेच सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia), लक्ष्मण ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी (Sunil Lahri) यांनी हजेरी लावली होती. 'रामायण' या मालिकेला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. आता ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रामायण'  कोणत्या चॅनलवर  टेलिकास्ट होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...


'या' चॅनलवर पाहा 'रामायण'


'रामायण' ही मालिका डीडी नॅशनलवर प्रसारित होणार आहे. नुकतीच याबाबत दूरदर्शन नॅशनल (डीडी नॅशनल) या चॅनलवर माहिती देण्यात आली आहे. 


दूरदर्शनने त्याच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर घोषणा केली की, रामानंद सागर यांची 'रामायण' ही मालिका पुन्हा छोट्या पडद्यावर येणार आहे. दूरदर्शनने एक व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  'पुन्हा एकदा धर्म, प्रेम आणि दानाची अलौकिक पौराणिक कथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे... संपूर्ण भारतातील सर्वात लोकप्रिय शो 'रामायण' लवकरच येत आहे, लवकरच डीडी नॅशनलवर रामायण पाहा."


नेटकऱ्यांनी व्यक्त केला आनंद


रामायण मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यानं आता प्रेक्षकांना आनंद झाला आहे. दूरदर्शनने शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट केली 'खूप चांगला निर्णय. कृपया प्रसारणाची वेळ आणि तारीख सांगा."  अनेक नेटकऱ्यांनी 'जय श्री राम' अशी कमेंट केली आहे. रामायण या मालिकेची वेळ आणि तारिख यांची माहिती अजून दूरदर्शनने दिलेली नाही.






 रामानंद सागर  यांची रामायण ही मालिका 1987 मध्ये प्रसारित झाली होती. लॉकडाऊनमध्ये देखील ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत होती.  'रामायण' मालिकेतील संगीत लोक आजही आवडीनं ऐकतात. या मालिकेला संगीत रवींद्र जैन यांनी दिले आहे. आता 'रामायण'  ही मालिका पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Dipika Chikhlia Love Story : रामायणातील 'सीतेला' तिच्या खऱ्या आयुष्यातला 'राम' कसा भेटला? दोन तासांची भेट अन् थेट निर्णय