Ramayan Dipika Chikhlia Love Story : दीपिका चिखलियाने (Dipika Chikhlia) अनेक हिंदी, दाक्षिणात्य आणि भोजपुरी सिनेमांत काम केलं आहे. पण 'रामायण' (Ramayan) मालिकेतील 'सीता'च्या भूमिकेमुळे दीपिकाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या 'रामायण' या पौराणिक मालिकेमुळे दीपिका चिखलिया हे नाव घराघरांत पोहोचलं. या मालिकेनंतर दीपिका सीता या नावानेच ओळखली जाऊ लागली. पण दीपिकाची लव्हस्टोरी तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या दीपिकाचा रिअर लाइफ राम कसा आहे...
दीपिका आणि हेमंतची पहिली भेट कुठे झाली?
दीपिका चिखलिया 22 नोव्हेंबर 1991 रोजी हेमंत टोपीवालासोबत (Dipika Chikhlia Husband Hemant Topiwala) लग्नबंधनात अडकली. हेमंत एक उद्योगपती आहे. 'श्रंगार' नावाच्या कॉस्मॅटिक ब्रॅंडचा तो मालक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत दीपिका आणि हेमंतची पहिली भेट कुठे झाली याबद्दल माहिती दिली होती.
'सुन मेरी लैला' या सिनेमाच्या सेटवर दीपिका आणि हेमंतची पहिली भेट झाली. या सिनेमाच्या माध्यमातून दीपिकाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. या सिनेमाच्या एका सीनदरम्यान दीपिकाला श्रंगार काजळाची जाहिरात करायची होती. त्यावेळी शूटिंग पाहण्यासाठी म्हणून हेमंत 'सुन मेरी लैला' या सिनेमाच्या सेटवर गेले होते. त्यावेळी दीपिका आणि हेमंतची पहिली भेट झाली.
दीपिका चिखलिया आणि हेमंत टोपीवालाची लव्हस्टोरी जाणून घ्या.. (Dipika Chikhlia Hemant Topiwala Love Story)
दीपिकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, आम्ही दोघं पहिल्या भेटीतचं एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. पण पहिल्या भेटीनंतर आम्ही आपापल्या कामात व्यस्त झालो. पण आम्हा दोघांनाही एकमेकांची आठवण येत असे. त्यानंतर अनेक दिवसांनी ब्यूटी पार्लरमध्ये आमची पुन्हा भेट झाली. त्यानंतर 28 एप्रिल 1991 रोजी आमची पुन्हा भेट झाली. दोन तासांच्या चर्चेनंतर आम्ही थेट एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला".
दीपिका आणि हेमंत 29 एप्रिल 1991 रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. दीपिका आणि हेमंतला जूही आणि निधी या दोन मुली आहेत. दीपिकाने रुपये दस करोड, घर का चिराग आणि खुलाई या सिनेमांतदेखील काम केलं आहे.
संबंधित बातम्या