Laxmichya Paulanni: छोट्या पडद्यावरील लक्ष्मीच्या पाऊलांनी (Lakshmichya Pavalani) मालिकेत नयना आणि अद्वैतच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. लग्न जरी नयना आणि अद्वैतचं होणार असलं तरी योगायोगाने कला आणि अद्वैतला आयुष्यभरासाठी एकत्र आणणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. साखरपुड्याची अंगठी अद्वैतकडून नयनाऐवजी कलाच्या बोटात घातली गेली. लग्नाची उष्टी हळदही नयनाऐवजी कलाला लागली. आता नयना आणि अद्वैत यांच्या लग्नात मोठा ट्विस्ट येणार आहे.
अद्वैतच्या घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी कोण येणार?
नियतीच्या मनातही अद्वैत आणि कलाने एकत्र यावं ही एकच इच्छा आहे. साखरपुडा, हळद आणि संगीत तर पार पडलंय. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती लग्नाची. नयना आणि अद्वैतच्या लग्नासाठी मंडप सजलाय. वऱ्हाडीही जमलेत. त्यामुळे अद्वैतच्या घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी नयना येणार की कला? हे लवकरच स्पष्ट होईल. त्यासाठी पाहायला विसरु नका लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिका.
'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेची स्टार कास्ट
अक्षर कोठारी ईशा केसकर दिपाली पानसरे आणि किशोरी आंबिये हे कलाकार लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
अभिनेत्री इशा केसकर ही "लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत कला खरे ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेबद्दल इशानं सांगितलं होतं, "नावाप्रमाणेच कला एक उत्तम कलाकार आहे. तिला हातकाम, रंगकला आणि चित्रकलेची आवड आहे. ती देवीची मूर्ती आणि दागिने घडवते. अंबाबाईच्या देवळाबाहेर कलाचं दागिन्यांचं दुकान आहे."
अद्वैतच्या लग्नात होणार सायली आणि अर्जुनची एन्ट्री
अद्वैतच्या लग्नात ठरलं तर मग मालिकेतील सायली आणि अर्जुन यांची देखील एन्ट्री होणार आहे, असं म्हटलं जात आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेमध्ये अमित भानुशाली,चैतन्य सरदेशपांडे , ज्योती चांदेकर हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: