FIR against Munawar Faruqui Fan: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss-17) या कार्यक्रमाचा विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा ठरला. मुनव्वर हा बिग बॉसची ट्रॉफी घेऊन डोंगरीमध्ये गेला होता. डोंगरीमधील मुनव्वरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता मुनव्वरच्या एका चाहत्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुनव्वर फारुकीच्या रोड शोदरम्यान त्याच्या एका चाहत्याने बेकायदेशीरपणे ड्रोनचा वापर केला. परवानगीशिवाय रोड शोमध्ये ड्रोन कॅमेरा आणल्याप्रकरणी मुनव्वरच्या चाहत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मुनव्वरच्या चाहत्याविरुद्ध एफआयआर दाखल
मुनव्वर फारुकीच्या चाहत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांनी मुनव्वरचा चाहता अरबाज युसूफ खानच्या नावावर एफआयआर नोंदवला आहे. मुंबई पोलीस हवालदार नितीन शिंदे यांनी पीएसआय तौसिफ मुल्ला यांच्यासह ड्रोनवर नजर ठेवली होती. यानंतर पोलिसांनी ड्रोन ऑपरेटरचा शोध घेतला. पोलिस तपासात अरबाज युसूफ खानचे नाव पुढे आले आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या परवानगीशिवाय ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करता येत नाही. ड्रोन वापरण्यासाठी पोलिसांची आधी परवानगी घ्यावी लागते. याशिवाय उपायुक्तांच्या परवानगीनंतरच ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करता येतो.
बिग बॉस 17 चा फिनाले 28 जानेवारी पार पडला. स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. बिग बॉसचे विजेतेपद जिंकल्यानंतर मुनव्वर ट्रॉफी घेऊन डोंगरी येथे गेला होते. डोंगरी येथे मुनव्वरच्या चाहत्यांनी त्यांच्या गाडीला चारही बाजूंनी घेरलं होतं. त्याचवेळी मुनव्वरही त्याच्या चाहत्यांना पाहून खूप खुश दिसत होता. याआधी मुनवर फारुकी यांनी लॉक-अप हा रिॲलिटी शोही जिंकला आहे.
मुनव्वरला मिळाले 50 लाख अन् ट्रॉफी
मुनव्वरला बिग बॉसच्या ट्रॉफीसोबतच 50 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहे. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे. 28 जानेवारीला मुनव्वरचा वाढदिवस होता. मुनव्वर फारुकीला वाढदिवशी चाहत्यांनी मोठं गिफ्ट मिळालं. त्याला बिग बॉस 17 या कार्यक्रमाची ट्रॉफी सलमान खानच्या हस्ते मिळाली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: