एक्स्प्लोर

पुण्यातलं बालगंधर्व पाडून आंतरराष्ट्रीय थिएटर बांधणार

पुण्यातलं बालगंधर्व रंगमंदिर ही पुणे शहराचा सांस्कृतिक वारसा सांगणारी वास्तू. मात्र आता 50 वर्षानंतर ही वास्तू पाडून तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं थिएटर होणार आहे.

पुणे : पुणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू मानल्या गेलेल्या बालगंधर्व रंगमंदिराची आत्ताची वास्तू पूर्णपणे पाडून नवीन वास्तू उभारण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आत्ताची वास्तू नेस्तनाबूत करुन नवीन इमारत बांधण्याची खरंच गरज आहे? असा सवाल उपस्थित करत या योजनेवर काही रंगकर्मींना आक्षेप घेतले आहेत. पुण्यातलं बालगंधर्व रंगमंदिर ही पुणे शहराचा सांस्कृतिक वारसा सांगणारी वास्तू. मात्र आता 50 वर्षानंतर ही वास्तू पाडून तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं थिएटर होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे पु. ल. देशपांडे यांच्या कल्पनेतून साकारलं. त्यामुळे ही वास्तू फक्त पुणेकरांसाठीच नाही तर समस्त नाट्यप्रेमींसाठी महत्त्वाची आहे. हे सांस्कृतिक केंद्र पुनर्विकसित करण्याच्या पालिकेच्या निर्णयावर काही कलाकारांनी आक्षेप घेतला आहे. नाटककार अतुल पेठे, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी या निर्णयावर नापसंती दर्शवली आहे. 1962 साली संभाजी बागेच्या जागेत बालगंधर्व रंगमंदिर उभारण्यात आलं आणि 1968 सालापासून इथे नाटक नांदू लागलं. 50 वर्षांनंतर आता या वास्तूची ‘एक्स्पायरी’ झाल्याने आता ‘अपडेटेड’ इमारत उभं राहणं गरजेचं आहे, अशी पालिकेची भूमिका आहे. नवीन इमारतीचा आराखडा हा कलाकारांच्या सल्ल्यानेच तयार केला जाईल अशी ग्वाही पालिकेकडून देण्यात आली आहे. पुण्यातलं बालगंधर्व पाडून आंतरराष्ट्रीय थिएटर बांधणार संस्कृतीचं अधिष्ठान मानल्या गेलेल्या बालगंधर्व रंगमंदिराची तळमजल्याची आसनक्षमता 669 आहे तर बाल्कनीची आसनक्षमता 320 आहे. सांस्कृतिक वारसा अंगाखांद्यावर ल्यालेल्या वास्तू जतन करायलाच हव्यात. पुढच्या पिढीला हा वारसा सांगायचा तर अशा वास्तू नष्ट होता कामा नयेत. कालौघात अशा वास्तू संपत जाणं आपल्या सांस्कृतिक प्रकृतीला परवडणारं नाही, म्हणून दुरवस्था झालेल्या वास्तू पुन्हा बांधायला हव्यात यात वादच नाही, त्या आणखी भव्य झाल्या पाहिजेत याचाही प्रश्नच नाही, मात्र ग्लोबलायझेशनची रंगरंगोटी करताना संस्कृतीचा, परंपरेचा सुगंध मात्र लोप पावता कामा नये. सुमारे साडेपाच दशकं महाराष्ट्राला आणि पुण्याला कला, संस्कृतीचा रतीब घालणाऱ्या नाट्यमंदिराला, आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय झाला असला तरी या वास्तूची मातीशी असलेली नाळ तुटू न देण्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Scorpio Car : वाल्मीक कराडांनी वापरलेली 'ती' पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ जप्तABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 07 January 2025Pune Health Officer on HMPV : HMPV कोरोना व्हायरससारखा नाही, सामान्य माणसाने काय काळजी घ्यावी?Pankaja Munde Speech : अजित पवार,फडणवीस बीडमधील राजकीय पर्यावरण सुधारू शकतील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
Embed widget