एक्स्प्लोर

Premachi Goshta Serial Update : पहिल्या चुंबनाने फुलणार सागर-मुक्ताचे प्रेम; प्रेमाची गोष्टचा रोमँटिक एपिसोड

Premachi Goshta Serial Update : आजचा एपिसोड हा नेहमीपेक्षा वेगळा ठरणार आहे. मालिकेतील आजचा एपिसोड हा रोमँटिक असणार आहे. सागर आणि मुक्ताच्या नात्यात विश्वास, प्रेमाने जागा घेतली आहे. आता,या दोघांमधील प्रेम आणखी फुलणार आहे.

Premachi Goshta Serial Update :  'प्रेमाची गोष्ट'मध्ये (Premachi Goshta)  मागील काही एपिसोडमध्ये शह-कटशह, सूड नाट्य दिसून आले होते. मात्र, आजचा एपिसोड हा नेहमीपेक्षा वेगळा ठरणार आहे. मालिकेतील आजचा एपिसोड हा  रोमँटिक असणार आहे. सागर आणि मुक्ताच्या नात्यात विश्वास, प्रेमाने जागा घेतली आहे. आता,या दोघांमधील प्रेम आणखी फुलणार आहे.

मिहिरमुळे सागरला होणार जाणीव

मिहिर मिहिकासोबत  फोनवर रोमँटिक बोलत असतो. त्याच वेळी सागर येतो आणि मिहिरचे बोलणं ऐकतो. मिहिर सागरला प्रेम व्यक्त करण्यासाठी चुंबन (किस) महत्त्वाचा असतो हे सांगतो. मिहिरच्या बोलण्याने सागर विचारात पडतो.  मुक्ताच्याही नवरा म्हणून माझ्याकडून काही अपेक्षा असतील हे मी विसरलो असल्याचे सागरच्या लक्षात येते. मुक्ताचा विचार सागरच्या डोक्यात घोळत असतो. मात्र, आपण काही केल्यास मुक्ताने आपल्याला मारलं तर... असाही विचार सागरच्या मनात येतो. पण, काहीही झालं तरी आता आपण पुढाकार घ्यायचा आणि मुक्ताला आणखी वाटा पाहायला लावायची नाही असे सागर ठरवतो. 

सागरची होणार फजिती

सागर घरी आल्यानंतर मुक्ता घरी बेडरुममध्ये पांघरूण घेऊन झोपली असल्याचे दिसते.  मुक्ता यावेळी घरी कशी असा विचारही सागरच्या मनात येतो. त्यावेळी सागर मुक्तासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. पण, ती झोपलेली व्यक्ती मुक्ताच आहे का, हे पाहत नाही आणि आपल्या मनातील भावना बोलण्यास सुरुवात करतो. सागर नात्याबद्दल आणि पहिल्या किसबद्दल बोलत असतो. मात्र, सागर पांघरूण काढतो तेव्हा झोपलेली व्यक्ती लकी असल्याचे समजते. त्यावेळी सागर घाबरतो. त्याचवेळी मुक्ताही येते. लकी मुक्ताला म्हणतो की, वहिनी तू दादूस विचार की तो यावेळी कशाला, कोणत्या कामासाठी आलाय हे विचार. लकीच्या रुमच्या साफसफाई सुरू असल्याने तो सागरच्या बेडरुममध्ये आलेला असतो. बेडरुममधून बाहेर पडताना लकी सागरला म्हणतो की, पुढच्या वेळी काही करण्याआधी चादरी खाली कोण आहे हे पाहा रोमिओ. हे ऐकून मुक्ताही लाजते. 

सागर मुक्तामध्ये फुलणार प्रेम

लकी बेडरुममधून निघून गेल्यावर मुक्ता आणि सागर दोघेही असतात. मुक्ताच्या ईअर रिंगमध्ये  तिचा स्कार्फ अडकतो, तिला तो सोडवता येत नसतो. सागर तिला मदत करायला जातो तेव्हाही ती त्याला नकार देते. तेव्हा सागर तिची मदत करतो आणि म्हणतो की, सगळ्या गोष्टी एकट्याने करू शकतो असे तुम्हाला वाटते का? त्यावर मुक्ता म्हणते की, 'का? आजची स्त्री आहे मी, सेल्फ मेड आणि स्वावलंबी.  सागर त्यावर म्हणतो की मी जे करणार ते तुम्ही कराल का? असे म्हणत सागर मुक्ताच्या गालावर किस घेतो. सागरची ही कृती मुक्तासाठी सुखद धक्का असतो. सागरच्या या कृतीवर मुक्ता प्रेमाने भावूक होते. आता तुम्हीदेखील मी जे केलं आहे, ते तुम्हीदेखील करा असे सागर मुक्ताला सांगतो. मी त्या क्षणाची वाट पाहतोय असे सागर मुक्ताला म्हणतो. मुक्ता विचारात गुंग असताना तेवढ्यात इंद्रा येते आणि मुक्ताला राहिलेल्या कामाची आवराआवर करायला सांगते. मुक्ता इंद्राला असंबंध उत्तर देत असते, याची जाणीव मुक्ताला होते आणि वेळ सांभाळून घेते. 

हॉलमध्ये सगळे बसले असताना सागर इशाऱ्यानेच मुक्ताला खुणावत असतो. हे पाहून मुक्ता त्याकडे दुर्लक्ष केल्याचे नाटक करते. आता मुक्ता सागरला कसा प्रतिसाद देणार, त्याचे आव्हान पार पाडणार का, हे पुढील एपिसोडमध्ये दिसून येणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget