Onkar Bhojane : अगं अगं आई.. पुन्हा ऐकायला मिळणार; प्रेक्षकांना खळखळून हसवायला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर आज येतोय ओंकार भोजने
Onkar Bhojane : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात आज आणि उद्या ओंकार भोजनेची धमाल पाहायला मिळणार आहे.
Onkar Bhojane in Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असलं तरी प्रेक्षक त्यांचा लाडका विनोदवीर ओंकार भोजनेला (Onkar Bhojane) मात्र खूप मीस करत होते. पण आज आणि उद्या हास्यजत्रेच्या मंचावर ओंकार भोजनेची धमाल पाहायला मिळणार आहे.
अगं अगं आई.. खास शैलीतले हे शब्द आपल्या कानावर पडता क्षणी ओंकार भोजने डोळ्यांसमोर उभा राहतो. पुन्हा एकदा तोच आवाज.. तेच पात्र आपल्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मंच पुन्हा एकदा विनोदाच्या आतशबाजीने दणाणून सोडायला ओंकार भोजने पुन्हा एकदा या मंचावर पाहता येणार आहे. ओंकारने उडवून दिलेले हास्याचे बार बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजनेची एन्ट्री होणार?
संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी एकमेव हास्यमालिका म्हणजेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'! टेंशन्स आणि फ्रस्ट्रेशन्स यांना मात मात देत, यातील अवली मंडळी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आलेली आहेत.'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाची जादू आजही, अनेक सिझन्सनंतरही सर्वत्र पाहायला मिळते आहे. त्यातले कलाकार हे आपले इतके जवळचे झाले आहेत की, प्रेक्षक त्यांना त्यांची थेट पसंती कळवतात. त्यांच्यावरली प्रेम-नाराजी सोशल मिडियावर व्यक्त करत असतात. ओंकार भोजनेही असाच एक अवलिया आहे जो रसिकांच्या मनावर आपल्या अभिनयाने राज्य करतोय आणि तो हास्यजत्रेत पुन्हा पुन्हा दिसावा यासाठी प्रेक्षकही आपली मागणी वारंवार करताना दिसतात. पण ओंकार वारंवार महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात दिसणार का हे अजून अनिश्चित आहे.
View this post on Instagram
ओंकार भोजनेची कॉमेडी जुगलबंदी
ओंकार 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत एका खास निमित्ताने येतोय. त्याची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात एन्ट्री झालेली नाही. त्याच्या आगामी 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ओंकार भोजने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने एक स्कीटदेखील सादर केलं. ओंकारचा हा सिनेमा 8 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या