'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धू यांना हटवलं, पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया भोवली
“केवळ काही लोकांमुळे पूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवणं योग्य होणार नाही” असं वक्तव्य नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं आहे. या वक्तव्यानंतर देशभरात नवज्योत सिंह सिद्धूंच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. याचा फटका आता सिद्धू यांना बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवज्योत सिंग सिद्धू यांना 'द कपिल शर्मा शो' हटवण्यात आलं आहे.
मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर 'द कपिल शर्मा शो'मधून माजी क्रिकेटर आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना हटवण्यात आल्याची सूत्रांची माहिती एबीपी न्यूजला मिळाली आहे.
“केवळ काही लोकांमुळे पूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवणं योग्य होणार नाही” असं वक्तव्य नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं आहे. या वक्तव्यानंतर देशभरात नवज्योत सिंह सिद्धूंच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. याचा फटका आता सिद्धू यांना बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवज्योत सिंग सिद्धू यांना 'द कपिल शर्मा शो' हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी अनेक कॉमेडी शोज् जज केलेली अभिनेत्री अर्चना पूरण सिंह दिसणार असल्याचंही समोर येत आहे.
सिद्धू यांच्या वक्तव्यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीक होत आहे. जनतेच्या रागाचा फटका शोला बसू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून 'द कपिल शर्मा शो'च्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
काय म्हणाले होते सिद्धू?
सिद्धू यांनी पुलवामा हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला होता. मात्र केवळ काही लोकांमुळे पूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवणं योग्य होणार नाही असं सिद्धू म्हणाले होते. फक्त संवादातूनच पाकिस्तानसोबत असलेले संबंध सुधारतील असं सिद्धू यांनी म्हटलं आहे. तर ‘या हल्ल्याचा निषेध करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 4000 जवान जात असताना त्याना कोणतीही सुरक्षा नाही? असू होऊचं कसं शकतं असा सवाल सिद्धू यांनी उपस्थित केला आहे. तसेच गुप्तचर यंत्रणांवरसुद्दा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
दहशतवाद्यांच्या मुद्द्यावर चर्चेतूनच कायमचा तोडगा निघू शकतो. आपल्या जवानांनी कधीपर्यंत बलिदान द्यायचं? आता या गोष्टींच्या मूळापर्यंत जाऊन त्यावर कायमचा उपाय काढला पाहिजे. एकमेकांवर आरोप करुन काही फायदा होणार नाही, असे सिद्धू म्हणाले.
व्हिडिओसंबंधित बातम्या
Pulwama terror attack : दहशतवादावर हल्ला करुन नाही तर संवादातून मार्ग निघेल : नवज्योत सिंह सिद्धू
Pulwama terror attack : ना विसरणार, ना माफ करणार; पुलवामा हल्ल्यानंतर सीआरपीएफचं ट्वीट Pulwama terror attack : 'त्या' शहीद जवानाची कॅन्सरग्रस्त आई अजूनही आपल्या मुलाची वाट पाहतेय Pulwama terror attack : पत्नीला दोन महिन्यात परत येतो म्हणाला अन्... Pulwama terror attack : देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आलं : शरद पवार Pulwama terror attack : सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यावर विकी कौशल म्हणतो... Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा! Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद