Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Kunya Rajachi Ga Tu Rani: 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेतील गुंजा 'या' अभिनेत्याला करतीये डेट; शर्वरी जोगनं सांगितला मालिकेत काम करण्याचा अनुभव


Kunya Rajachi Ga Tu Rani:  कुन्या राजाची गं तू रानी (Kunya Rajachi Ga Tu Rani) ही मालिका 18 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. डोंगरवाडी सारख्या छोट्याश्या खेडेगावात रहाणाऱ्या मात्र मोठी स्वप्न पहाणाऱ्या गुंजाची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. या मालिकेतील गुंजा म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोगनं (Sharvari Jog) एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये शर्वरीनं तिच्या या नव्या मालिकेतील भूमिकेची माहिती दिली आहे.






 


Tujhech Mi Geet Gaat Aahe : मंजुळाची आई आली मल्हारच्या घरी; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत येणार ट्वीस्ट?


Tujhech Mi Geet Gaat Aahe :  ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत  अनेक ट्वीस्ट येत असतात. मल्हार आणि मोनिका यांच्या घरात मंजुळा सध्या राहात आहे. आता मल्हारच्या घरी मंजुळाची आई येणार आहे. अभिनेत्री उषा नाईक या मंजुळाच्या आईची भूमिका साकारत आहेत. नुकताच ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळाची आई ही मल्हारच्या घरी आली आहे आणि ती मोनिकासोबत बोलत आहे. 







Marathi Actors: मराठी कलाकार आणि कॉन्ट्रोव्हर्सी; 'या' कारणांमुळे कलाकार अडकले वादाच्या भोवऱ्यात


Marathi Actors: विविध कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अनेक वेळा कलाकार अडकतात. कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी कामामुळे कलाकार वादाच्या भोवऱ्यात अडकतात. जाणून घेऊयात मराठी कलाकारांच्या कॉन्ट्रोव्हर्सीबद्दल...






Harshada Khanvilkar: मध्यमर्गीय कुटुंबात गेलं बालपण, अक्कासाहेब होऊन प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं अधिराज्य; जाणून घ्या अभिनेत्री हर्षदा खानविलकरबद्दल


Harshada Khanvilkar: अभिनेत्री हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla), पुढचं पाऊल (Pudhcha Paaul), ऊन पाऊस (Oon Paus) यांसारख्या मालिकांमध्ये हर्षदानं काम केलं आहे. हर्षदाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात हर्षदाच्या बालपणाबद्दल...







Kedar Shinde ON Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा मी पुरुषांसाठी बनवला आहे : केदार शिंदे


Kedar Shinde On Baipan Bhaari Deva : केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पाच कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने रिलीजच्या दहा दिवसांत 26.19 कोटींची कमाई केली आहे. 'बाईपण भारी देवा' या सिनेमाबद्दल बोलताना एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदे म्हणाले,"मी हा सिनेमा पुरुषांसाठी बनवला आहे. या सिनेमाला मिळत असलेलं यश पाहून नक्कीच आनंद होत आहे. हा सिनेमा आता आमचा नसून मायबाप प्रेक्षकांचा झाला आहे. ".