Marathi Actors: विविध कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अनेक वेळा कलाकार अडकतात. कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी कामामुळे कलाकार वादाच्या भोवऱ्यात अडकतात. जाणून घेऊयात मराठी कलाकारांच्या कॉन्ट्रोव्हर्सीबद्दल...


राजेश शृंगारपुरे (Rajesh Shringarpure) आणि रेशम टिपणीस (Resham Tipnis)


बिग बॉस मराठी या शोमध्ये अभिनेता राजेश शृंगारपुरे आणि अभिनेत्री रेशम टिपणीस यांनी सहभाग घेतला होता. राजेश आणि रेशम यांच्यामधील वाढती जवळीक आणि या दोघांच्या बिग बॉसच्या घरातील वागण्यावर अनेकांनी टीका केली होती. 


अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao)


अभिनेता अनिकेत विश्वासराव हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.सिनेक्षेत्रात आपल्यापेक्षा आपल्या पत्नीचे नाव मोठं होऊ नये म्हणून पत्नीला गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार अभिनेता अनिकेत विश्वासराव याची पत्नी स्नेहा विश्वासराव हिने पुण्याच्या अलंकार पोलीस ठाण्यांमध्ये केली होती. त्यानंतर अनिकेत हा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.






 
हिना पांचाळ (Heena Panchal)



ईगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणमुळे  हिना पांचाळ ही चर्चेत होती. इगतपुरीमध्ये पोलिसांनी हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला होता.या रेव्ह पार्टीमधून पोलिसांनी हीना पांचाळसह 25 जणांना अटक केली होती. मराठी बिग बॉसमुळे हिनाला विशेष लोकप्रियता मिळाली.







अभिजित बिचुकले(Abhijeet Bichukale)



वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिजित बिचुकले नेहमीच चर्चेत असतो.  अभिजीत बिचुकलेनं बिग बॉस या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी बिग बॉसच्या घरात त्यांनी अनेकांवर टीका केली.  अभिजित बिचुकले यांच्या बिग बॉसच्या घरातील वक्तव्यांवर अनेकांनी टीका केली होती.


पराग कान्हेरे (Parag Kanhere)



पराग कान्हेरेनं देखील बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. बिग बॉसच्या घरात पराग कान्हेरेनं नेहा शितोळेला मारलं होतं, असं म्हटलं गेलं.त्यानंतर परागला बिग बॉस या शोमधून बाहेर पडला. बिग बॉसच्या घरातील परागच्या वागण्यामुळे अनेकांनी त्याला ट्रोल केलं होतं.


Marathi Actress: मराठमोळ्या अभिनेत्रींचा बॉलिवूडमध्ये डंका; हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये साकारल्या भूमिका