Kunya Rajachi Ga Tu Rani:  कुन्या राजाची गं तू रानी (Kunya Rajachi Ga Tu Rani) ही मालिका 18 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. डोंगरवाडी सारख्या छोट्याश्या खेडेगावात रहाणाऱ्या मात्र मोठी स्वप्न पहाणाऱ्या गुंजाची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. या मालिकेतील गुंजा म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोगनं (Sharvari Jog) एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये शर्वरीनं तिच्या या नव्या मालिकेतील भूमिकेची माहिती दिली आहे.

Continues below advertisement


मुख्य नायिका असलेली ही तुझी पहिली मालिका आहे. या मालिकेबद्दल तुझ्या मनात काय भावना आहेत? असा प्रश्न शर्वरीला मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत शर्वरी म्हणाली, 'मी पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारत आहे, प्रमुख भूमिका साकारण्याचं माझं स्वप्न होतं. थोडं दडपण आहे,थोडीशी भीती देखील वाटली पण उत्साह आहे.'


शर्वरीनं सांगितला गुंजा नावाचा अर्थ


शर्वरी कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेत गुंजा ही भूमिका साकारत आहे. गुंजा या नावाचा अर्थ शर्वरीनं या मुलाखतीमध्ये सांगितला. ती म्हणाली,   'गुंजा हे रानफळ आहे. अजूनही खेडेगावात गुंजा फळाचा वापर सोनं मोजण्यासाठी होतो . म्हणजे एक गुंजा सोनं , पाच गुंजा सोनं असं. तर गुंजाचं झाडदेखील औषधी असते. ज्याचं सोन्यानं मोल होतं असं म्हणजे गुंजा.तर गुंजाची माळदेखील माझ्या गळ्यात आहे. गुंजाला खूप मोठं महत्व आहे.'


असं कोणतं  स्वप्न आहे का जे तुला पूर्ण करायचं आहे? असा प्रश्न देखील शर्वरीला मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत शर्वरी म्हणाली, 'मला मालिकेत काम करायचंय, हे मी लहानपणापासून ठरलं होतं. माझं कोल्हापूर येथून मुंबईत येण्याचं स्वप्न पूर्ण झालं. मला वेगवेगळे इमोशन्स असलेल्या
भूमिका करायच्या आहेत.'


मालिकेत काम करण्याच्या अनुभवाबद्दल शर्वरी म्हणाली, 'शर्वरी म्हणून मी जे काही नाही केलं ते मी गुंजा म्हणून केलं आहे. मला पोहण्याची भीती वाटायची पण आता मी सहज पाण्यात उतरते.  मी कधी झाडावर चढले नव्हते या मालिकेच्या निमित्तानं मी आंब्याच्या झाडावर चढल. या मालिकेच्या निमित्तानं मी अनेक नवीन गोष्टी शकत आहे.'


गौरव मालणकरसोबतच्या डेटिंगच्या चर्चेबद्दल शर्वरी म्हणाली, 'आम्ही एकमेकांना डेट करत आहोत,त्याचे आई-बाबा मला मुलगी असल्यासारखं सांभाळतात. '


शर्वरीसोबतच अभिनेता हर्षद अतकरी देखील कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. तो या मालिकेत कबीर  ही भूमिका साकारत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Kunya Rajachi Ga Tu Rani: 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेचं टायटल साँग आलं प्रेक्षकांच्या भेटीस; नेटकऱ्यांनी केलं कौतुक