Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Bhushan Pradhan : बाप्पाची मूर्ती बनवतो अन् घरीच त्याचं विसर्जन करतो; भूषण प्रधानचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव


Bhushan Pradhan on Kalavantancha Ganesh : गणपती बाप्पा (Ganapati Bappa) आणि गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) हा प्रत्येकासाठी खास असतो. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीचंही बाप्पासोबत छान नातं असतं. आता एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये अभिनेता भूषण प्रधानने (Bhushan Pradhan) बाप्पासोबतचं त्याचं नातं शेअर केलं आहे. भूषण म्हणाला,"बाप्पा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे". 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Ashok Saraf: लिटिल चॅम्प्सच्या मंचावर अशोक मामा झाले भावूक; व्हिडीओ व्हायरल


Ashok Saraf: अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर अशोक मामांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अशोक सराफ भावूक झालेले दिसत आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Sankarshan Karhade: संकर्षणनं अमेरिकेत बनवला फोडणीचा भात आणि फोडणीची पोळी; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, 'त्यांच्या स्वयंपाकघरात...'


Sankarshan Karhade: अभिनेता अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade)  हा नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. तसेच संकर्षण हा सोशल मीडियावर देखील विविध पोस्ट शेअर करतो. नुकताच संकर्षणनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो अमेरिकेमध्ये स्वयंपाक करताना दिसत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Kiran Mane: 'आनंदाचे डोही आनंद तरंग घेऊन थिएटरबाहेर पडलो...'; किरण माने यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष


Kiran Mane:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. नुकतीच किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर करुन जवान या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हरिवंश राय बच्चन, अमिताभ बच्चन आणि विविध चित्रपटांचा उल्लेख केला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Manoj Jarange Movie : मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर येणार चित्रपट; 'संघर्षयोद्धा' सिनेमाचं पोस्टर आऊट


Manoj Jarange Movie Sangharshyodha : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी ते संघर्ष करत आहेत. आता त्यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'संघर्षयोद्धा' (Sangharshayoddha) असे या सिनेमाचे नाव आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा