Manoj Jarange Movie Sangharshyodha : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी ते संघर्ष करत आहेत. आता त्यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'संघर्षयोद्धा' (Sangharshayoddha) असे या सिनेमाचे नाव आहे.


मनोज जरांगे (Manoj Jarange Movie) यांचे 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. दरम्यान आज अंतरवाली सराटी येथे संघर्षयोद्धा सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण झाले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्याकरिता जो लढा उभारला आहे. त्याला सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी 'संघर्षयोद्धा' या सिनेमाचे चित्रीकरण येत्या डिसेंबर महिन्यात सुरू होईल. मार्च 2024 पर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आहे. जालन्यातल्या अंतरवाली सराटी येथे उपोषण करते मनोज जरंगे यांच्या हस्ते करण्यात आले.


रोहन पाटील झळकणार मनोज जरांगेंच्या भूमिकेत


मनोज जरांगे (Manoj Jarange Biopic) यांच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहे. 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यामुळे मुख्य भूमिकेत कोण झळकणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता होती. तर या सिनेमात अभिनेता रोहन पाटील (Rohan Patil) मनोज जरांगे यांच्या भूमिकेत झळकणार आहे. आज मनोज जरांगे यांच्या हस्ते या सिनेमाचं पोस्टर आऊट करण्यात आलं आहे. हा सिनेमा विधानसभेच्या अगोदर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


'संघर्षयोद्धा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शिवाजी दोलताडे सांभाळणार आहेत. या सिनेमाबद्दल बोलताना ते म्हणाले,"संघर्षयोद्धा' या सिनेमाच्या शूटिंगची सुरुवात सराटी या गावामधून होणार आहे. जन्मगावासह मुंबईतही या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. मनोज जरांगे यांचा संघर्ष लोकांसमोर येणं गरजेचं असल्याने आम्ही त्यांच्यावर बायोपिक बनवत आहोत". 


दोलताडे पुढे म्हणाले,"मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. त्यांचा संघर्ष आजचा नसून खूप जुना आहे. पण लोकांना त्यांचा हा संघर्ष माहिती नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा करण्याचा निर्णय घेतला. या सिनेमात मनोज जरांगे यांच्या भूमिकेत अभिनेता रोहन पाटील दिसेल. सिनेमाचं पोस्टर पाहिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनाही आनंद झाला आहे. त्यांनी या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


संबंधित बातम्या


Manoj Jarange: मनोज जरांगेंचा संघर्ष रुपेरी पडद्यावर, चित्रपटात कोण साकारणार भूमिका?