Bhushan Pradhan on Kalavantancha Ganesh : गणपती बाप्पा (Ganapati Bappa) आणि गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) हा प्रत्येकासाठी खास असतो. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीचंही बाप्पासोबत छान नातं असतं. आता एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये अभिनेता भूषण प्रधानने (Bhushan Pradhan) बाप्पासोबतचं त्याचं नातं शेअर केलं आहे. भूषण म्हणाला,"बाप्पा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे". 


एबीपी माझाशी बोलताना भूषण म्हणाला,"गणपती बाप्पा आणि माझं खूप स्पेशल नातं आहे. इतर देवांना आपण अहो-जाहो करतो. पण गणपती बाप्पा म्हटलं की, हक्काने आपण त्याला अरेतुरे करतो. बाप्पा हा आपलाच आहे, असं आपल्याला वाटतं. बाप्पा हा माझ्यासाठी खूप जवळचा आहे. बाप्पावर खूप वेगळ्या प्रकारचा विश्वास आहे. बाप्पाकडे मी कधीच काही मागत नाही. तो जे करतो ते आपल्या चांगल्यासाठी करतो, असा विश्वास आहे. मुंबईत घर घेतल्यापासून गेल्या आठ वर्षांपासून आमच्या घरी दीड दिवसांचा गणपती येतो". 


आनंदाचा क्षण असो किंवा दु:खाचा बाप्पा कायमच सोबत : भूषण प्रधान


भूषण प्रधान म्हणाला,"आनंदाचा क्षण असो किंवा दु:खाचा बाप्पा कायमच आपल्यासोबत आहे, असं ठामपणे वाटतं. बाप्पा जे करतो ते चांगल्यासाठीच करतो, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळेच बाप्पाच्या आरतीत संकटी पावावे, असे लिहिण्यात आले आहे. बरेच जण आरती म्हणताना संकष्टी पावावे म्हणतात ते चुकीचे आहे. कारण बाप्पा आपल्या आयुष्यात जी संकटे आणतो ते चांगल्यासाठीच आणत असतो. हा विश्वास असल्यामुळे कायमच बाप्पा माझ्या पाठीशी आहे". 



भूषण प्रधान पुढे म्हणाला,"मुंबईत घर घेतल्यानंतर जेव्हा बाप्पाची मूर्ती पहिल्यांदा आम्ही आमच्या घरी आणली. त्या वर्षी एक वेगळाच उत्साह होता. घरी शाडूची माती आणली आणि त्यातून आईने पहिल्यांदा गणपतीची मूर्ती बनवली. तेव्हापासून कायमच आम्ही घरी बाप्पाची मूर्ती बनवतो आणि घरीच त्याचं विसर्जन होतं. पुण्याहून व्यस्थित मुंबईतल्या घरी बाप्पाची मूर्ती आणली जाते आणि त्याचं विसर्जनही मुंबईतल्या घराच्या बाहेरील पॅसेजमध्ये होतं. त्यामुळे अतिशय पर्यावरणपूरक गणेशोत्सव आम्ही साजरा करतो. बाप्पा येतात हे मूर्तीच्या रुपाने नाही तर घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या रुपात बाप्पा येतो, असं मला वाटतं. त्यामुळे पाहुण्यांचं हसणं, त्यांची सकारात्मक उर्जा या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात". 



भूषण प्रधानने बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला केली सुरुवात


भूषण प्रधानने बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला सुरुवात केली आहे. भूषण प्रधान बाप्पाची मूर्ती बाहेरुन कुठून न आणता घरीच शाडूच्या मातीची बाप्पाची मूर्ती बनवतो. याबद्दल तो म्हणाला,"मूर्तीची तयारी सुरू झाली आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आईला मूर्ती बनवण्यात थोडी मदत केली आहे. आई खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बनवते. त्यामुळे खरंतर तिच्या या कामात मी लुडबूडचं केली आहे. बाप्पाची मूर्ती रंगवण्याचा माझा दरवर्षी हट्ट असतो. सजावटही पर्यावरणपूरक करण्यावर माझा भर असतो". 


संबंधित बातम्या


Aadesh Bandekar : दुधीच्या रसाने जेव्हा जीव जाता जाता राहिला, तेव्हा वाटलं बाप्पा माझ्या पाठिशी; आदेश बांदेकरांनी सांगितला 'पुनर्जन्मा'चा किस्सा