Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Adinath Kothare : 'चंद्रमुखी'मधला दौलतराव बनला रॅपर; आदिनाख कोठारेची 'बजाव' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


 Adinath Kothare : आदिनाथचा रॅपर स्वॅग सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचा हा रॅपर स्वॅग जिओ सिनेमावरील ‘बजाव’ या वेबसिरीज मधला आहे.आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करीत अभिनेता आदिनाथ कोठारेने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

 


Amruta Khanvilkar : यंदाचा गणेशोत्सव होणार अधिकच भक्तिमय; अमृता खानविलकरचं पहिलंवहिलं गाणं 'गणराज गजानन' प्रेक्षकांच्या भेटीला


 Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर निर्मित 'गणराज गजानन' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने आणि नृत्य अदाकारीने सर्वांना घायाळ घालणाऱ्या अमृता खानविलकरने गणेशोत्सवानिमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी एक भेट आणली आहे.अमृता खानविलकर निर्मित 'गणराज गजानन' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

 


Ajinkya Deo: "सावली होऊन सतत साथ देणारी माय आता भेटत नाही..."; अजिंक्य देव आईच्या आठवणीत भावूक, शेअर केला व्हिडीओ


Ajinkya Deo:  ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. अनेक सेलिब्रिटींनी तसेच त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरच्या माध्यमातून सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली.  सीमा देव यांचे पूत्र अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी  नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते एक कविता सादर करताना दिसत आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Aadesh Bandekar : दुधीच्या रसाने जेव्हा जीव जाता जाता राहिला, तेव्हा वाटलं बाप्पा माझ्या पाठिशी; आदेश बांदेकरांनी सांगितला 'पुनर्जन्मा'चा किस्सा


Aadesh Bandekar On Kalavantancha Ganesh : गपणती बाप्पा (Ganapati Bappa) हा प्रत्येकासाठी स्पेशल असतो. आदेश बांदेकरांचंही (Aadesh Bandekar) बाप्पासोबत खूप छान नातं आहे. बाप्पाबद्दल एबीपी माझाशी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले,"गणपती आणि माझं नातं खूप जिव्हाळ्याचं आणि अत्यंत प्रेमाचं, सन्मानाचं नातं आहे. मुळात बाप्पा हा माझा मित्र आहे. त्यामुळे कायम तो माझ्या सोबत असतो. आमच्या बांदेकर कुटुंबाचा गणपती असतो. 100 वर्षांहून अधिक काळ आमच्या बाप्पाला झाला आहे". 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


'रात्री तीन-चारला पॅकअप करुन निघाल्यानंतर प्रवासात...' ; कुशल बद्रिकेनं शेअर केला खास व्हिडीओ


Kushal Badrike : मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. कुशल हा  'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामधून  प्रेक्षकांच्या भेटीला येतो. तो त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. नुकताच कुशलनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा