Adinath Kothare : 'चंद्रमुखी'मधला दौलतराव बनला रॅपर; आदिनाख कोठारेची 'बजाव' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करीत अभिनेता आदिनाथ कोठारेने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदिनाथचा रॅपर स्वॅग सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचा हा रॅपर स्वॅग जिओ सिनेमावरील ‘बजाव’ या वेबसिरीज मधला आहे.
‘ओजी’ या दिल्लीतल्या रॅपरची खलनायकी छाप असलेली भूमिका आदिनाथने साकारली आहे.
आजवर सोज्वळ धाटणीच्या भूमिका करणाऱ्या आदिनाथसाठी हा एक चॅलेजिंग रोल असल्याचे तो सांगतो.
आपल्या भूमिकेविषयी आदिनाथ सांगतो, ‘माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला पहिल्यांदाच ‘बजाव’ मुळे करता आली.
आदिनाथ म्हणाला,मी पक्का मुंबईकर आहे.. या भूमिकेसाठी दिल्लीच्या भाषेचा लहेजा आत्मसात करणे आणि रॅपरचा स्वॅग अंगात भिनवणे माझ्यासाठी खूप चॅलेजिंग होतं. खूप मजामस्ती आणि धमाल आणणारी ही वेबसिरीज आहे.
आदिनाथ पुढे म्हणाला,नकारात्मक धाटणीच्या या भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेतली, ही सिरीज माझ्यासाठी विशेष आहे कारण, आपल्या कंफर्ट झोनमधून बाहेर येऊन वेगळं करायला मिळाल्याचं समाधान ‘बजाव’ने दिल्याचं आदिनाथ सांगतो.
बॉडी लँग्वेज पासून ते अगदी शिव्यांचा ‘रिदम फ्लो’ कसा असायला हवा? या सगळया गोष्टी आदिनाथने स्वतः:मध्ये बारकाईने भिनवत हा दिल्लीयेट ‘ओजी’ रॅपर साकारला आहे.
आदिनाथच्या 'बजाव' या वेबसीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि माझी मेहनत या दोन्ही गोष्टींमुळे ही भूमिका चांगल्या प्रकारे करू शकलो, असे आदिनाथ म्हणाला.