Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Swanandi Tikekar: कुटुंबियांपासून राहते वेगळी, पैसे कमावण्याची संधी सोडून संघर्ष करण्याचा घेतला निर्णय;वैयक्तिक आयुष्याबाबत भरभरुन बोलली स्वानंदी


Swanandi Tikekar: अभिनेता उदय टिकेकर (Uday Tikekar) आणि गायिका आरती अंकलीकर (Arati Ankalikar-Tikekar) यांची मुलगी स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) ही देखील अभिनेत्री आहे. स्वानंदीनं अनेक अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे स्वानंदीला विशेष लोकप्रियता मिळाली.  स्वानंदीनं नुकत्याच एका मुलाखतीध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं... 



Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'चं सगळंच भारी; लक्ष वेधणाऱ्या अभिनेत्रींच्या साड्यांच्या रंगांची खासियत माहितीये?


Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. कथानक, दिग्दर्शन, गाणी आणि कलाकारांच्या अभिनयाबरोबर अभिनेत्रींनी 'मंगळागौर' गाण्यात नेसलेल्या साड्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण या साड्यांची खासियत आहे. वेशभूषा करणाऱ्या युगेशा ओंकारने खूप विचार करुन साड्यांची निवड केली आहे.



Sanjay Jadhav: 'दुनियादारीचं शूट सुरु असताना फोन आला अन्'; संजय जाधव यांनी सांगितली वडिलांची आठवण


Sanjay Jadhav: दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्या दुनियादारी (Duniyadari) या चित्रपटाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. संजय जाधव यांनी अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. पण त्यांच्या दुनियादारी या चित्रपटाला विशेष लोकप्रियता मिळाली. एका मुलाखतीमध्ये संजय जाधव यांनी त्यांच्या वडिलांची आठवण सांगितली.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Duniyadari : 'तेरी मेरी यारी..' ते 'टिक टिक वाजते', दिग्याची मस्ती ते टपरीवरचा चहा; ब्लॉकबस्टर 'दुनियादारी'ची 10 वर्ष


Duniyadari : 'दुनियादारी' (Duniyadari) या ब्लॉकबस्टर सिनेमाला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 19 जुलै 2013 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. आज 10 वर्षांनंतरही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. तरुणाईची पाऊले सिनेमागृहाकडे वळवण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत दयाबेनचं कमबॅक; 'गोकुळधाम'चे रहिवासी दिमाखात करणार दिशा वकानीचं स्वागत


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या 15 वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. 2008 मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला असून आजही या मालिकेची चांगलीच क्रेझ आहे. मालिकेच्या कथानकापासून स्टार कास्टपर्यंत सर्वच गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता या मालिकेत दयाबेनची (Dayaben) एन्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे.