Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा छोट्या पडद्यावरी  लोकप्रिय शो आहे. या शोमधील जेठालाल, बापूजी, तारक मेहता, सोढी या व्यक्तिरेखांना चाहत्यांची पसंती मिळाली. या शोमध्ये अभिनेता अमित भट्ट हा बापूजींची भूमिका साकारत आहे. सध्या अमित भट्ट (Amit Bhatt)  हा त्याच्या एका फोटोमुळे चर्चेत आहेत. अमित भट्टनं त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर अनेकांनी अमितला ट्रोल करण्यास सुरुवात केली.


अमित भट्टने काही दिवसांपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, या फोटोमध्ये अमित भट्ट हा जीन्स, शॉर्ट कुर्ता आणि टोपी अशा लूकमध्ये एका बाईकवर बसलेला दिसला.या फोटोमध्ये अमित हा रॉयल एनफील्ड या गाडीवर बसलेला दिसत आहे. अमितनं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या.


अभिनेता सचिन श्रॉफनं अमित भट्टने शेअर केलेल्या फोटोवर  कमेंट केली. तसेच काही नेटकऱ्यांनी देखील अमितनं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट केली आहे. अमितनं शेअर केलेल्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'चंपक चाचाचं हेल्मेट कुठे आहे? तुम्ही तुमचे सर्व ज्ञान शोमध्ये सोडले आहे का?'






28 जुलै 2008  रोजी  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.  'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये अभिनेत्री जेनिफर मिस्त्री ही मिसेस सोढी ही भूमिका साकारत होती. जेनिफर मिस्त्रीनं 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या   शोच्या निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप केले. 


या कलाकारांनी सोडली मालिका


शैलेश लोढा (Shailesh Lodha) , राज अनादकट (Raj Anadkat) ,दिशा वकानी (Disha Vakani) , झील मेहता, भव्या गांधी,  गुरुचरण सिंह या कलाकारांनी मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.   


 इतर महत्त्वाच्या बातम्या: 


जेनिफरनंतर 'तारक मेहता'मधील रिटा रिपोर्टरची भूमिका साकारलेल्या प्रिया आहुजाने असित मोदींवर केले आरोप; म्हणाली...