Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. कथानक, दिग्दर्शन, गाणी आणि कलाकारांच्या अभिनयाबरोबर अभिनेत्रींनी 'मंगळागौर' गाण्यात नेसलेल्या साड्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण या साड्यांची खासियत आहे. वेशभूषा करणाऱ्या युगेशा ओंकारने खूप विचार करुन साड्यांची निवड केली आहे.


'मंगळागौर' गाण्यात सहा अभिनेत्रींनी ऑफ व्हाईट रंगाच्या साड्या नेसल्या आहेत. पण या प्रत्येक साडीच्या पदराचा रंग मात्र वेगळा आहे. ऑफ व्हाईट रंग हा स्वच्छता आणि शुद्धता दर्शवणारा आहे. 'बाईपण भारी देवा' या सिनेमातील जया, साधना, चारु, केतकी आणि पल्लवी या सहा पात्रांचे स्वभाव एकमेकांपासून भिन्न आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वभावानुसार त्यांच्या साड्यांच्या पदरांना रंग देण्यात आले आहेत. साड्यांसह अभिनेत्रींचे ब्लाऊजदेखील लक्ष वेधणारे आहेत. या ब्लाऊजवर आई, बहिण, बायको, मुलगी असे लिहिलेले आहे.


जया - हिरवा रंग


'बाईपण भारी देवा' या सिनेमात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांनी जयाचे पात्र साकारले आहे. त्यांचा पदर हिरव्या रंगाचा आहे. हिरवा रंग हा नकारात्मक गुण, एकाच जागी अडकून राहणं तसेच मातृत्व आणि शांतता दर्शवणारा असल्याने जयाच्या पात्रासाठी या रंगाची निवड करण्यात आली आहे. जया ही सिनेमात एका गोष्टीत अडकलेली दिसून येते.



शशी - केशरी रंग


'बाईपण भारी देवा' या सिनेमात अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी शशीची भूमिका साकारली आहे. त्यांच्या स्वभाव नकारात्मक असला तरी त्या प्रचंड उत्साही आहेत. त्यामुळे त्यांच्या पदराला केशरी रंग देण्याला आला आहे.



साधना - जांभळा रंग


'बाईपण भारी देवा' या सिनेमात सुकन्या मोने (Sukanya Mone) यांनी साधनाचं पात्र साकारलं आहे. साधना ही खूप हळवी आहे. तिच्याही आयुष्यात नकारात्मकता आहे. पण त्यासोबत ती धार्मिकदेखील आहेत. त्यामुळे तिच्या पदराला जांभळा रंग देण्यात आला आहे.



पल्लवी - गडद निळा रंग


अभिनेत्री सुचित्रा बांदेकरने (Suchitra Bandekar) 'बाईपण भारी देवा' या सिनेमात पल्लवीची भूमिका साकारली आहे. निराश, एकटेपणा आणि प्रामाणिकपणा या गोष्टींची पल्लवी जोडली गेलेली असल्याने तिच्या पदराला गडद निळा रंग देण्यात आला आहे.



केतकी - फिकट निळा रंग


'बाईपण भारी देवा' या सिनेमात अभिनेत्री शिल्पा नवलकरने (Shilpa Navalkar) केतकीची भूमिका साकारली आहे. केतकीला स्वत:बद्दल खूप अभिमान आहे. पण तेवढीच ती संवेदनशीलही आहे. त्यामुळे तिच्या पदराला फिकट निळा रंग देण्यात आला आहे.



चारु - लाल रंग


'बाईपण भारी देवा' या सिनेमात अभिनेत्री दीपा परबने (Deepa Parab) 'चारू' हे पात्र साकारलं आहे. लाल रंग हा दबाव, ताणतणाव, प्रेम आणि धाडस दर्शवणारा असल्याने चारुच्या पदराला हा रंग ठेवण्यात आला आहे.



संबंधित बातम्या


Baipan Bhaari Deva : बॉक्स ऑफिसवर 'बाईपण भारी देवा'ची हवा; सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय?