एक्स्प्लोर

Kiran Mane: 'बाईच्या मोहाच्या 'पिंजर्‍यात' अडकला की...'; किरण माने यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Kiran Mane:  अभिनेते  किरण माने (Kiran Mane)  हे मालिका आणि विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. किरण माने यांनी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं,  'सेक्सची भूक' ही गोष्ट लै खत्तरनाक भावांनो! त्या नादात मानूस एकदा का घसरला की भल्याभल्यांचं माकड होतं. एकवेळ 'बाटली'तनं माणूस सहज बाहेर पडेल, पण बाईच्या मोहाच्या 'पिंजर्‍यात' अडकला की, त्याच्या 'नशिबानं थट्टा मांडली'च म्हणून समजा. हे लक्षात घेऊनच आपल्या तुकोबारायांवर खार खाऊन असलेल्या विरोधकांनी त्याच्या बदनामीसाठी 'हनी ट्रॅप' लावला होता भावांनो. पण चारीत्र्यवान तुकोबारायानं त्या बाईला आदरानं दूर करत असा उपदेश केला की ती सुद्धा या विचारांनी भारावून गेली. अंतर्बाह्य बदलून गेली!'

'मंबाजी आणि त्याच्या टोळक्यानं एका वेश्येला पैशांचं आमिष दाखवून तुकोबारायाकडं पाठवलं होतं. तिनं त्यांच्या प्रवचनाला जाऊन, अनुयायी असल्याचं नाटक करून तुकाराम महाराजांना नादी लावायचं आणि या टोळीनं त्यांना रेडहँड पकडून त्यांची बदनामी करायची असं कारस्थान रचलं होतं. पण तुकोबारायाला एवढे लेचेपेचे होते व्हय? आवो, तुकोबा वरवरचे संत नव्हते. आतून बाहेरून अस्सल, शंभर नंबरी सोनं होतं ते.. भुलले नाही असल्या मोहाला.' असंही किरण यांनी किरण लिहिलं.

पोस्टमध्ये किरण माने यांनी तुकोबांचा एक अभंग लिहिला आहे. हा अभंग लिहून पुढे कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, तीसुद्धा एक बाई आहे, तिच्या शारिरीक इच्छा पूर्ण करून घ्यायचा तिला अधिकार आहे..त्या भावनेचा मान राखत, तिला सेक्सच हवा असेल तर बाहेर अनेक 'नर' आहेत, तिकडे तिनं जावं हे नम्रपणे सांगणं तर अफलातून आहे ! आपल्याला शब्दांचा,भाषेचा समर्पकपणे वापर शिकायचा असंल तर तुकारामांच्या अभंगांसारखं साधन नाय ! शेवटच्या ओळीत तुकोबारायांनी 'पुरूष' हा शब्द न वापरता 'नर' हा शब्द वापरलाय. इथं प्रतिभेची झलक दिसते. फक्त सेक्ससाठी एकत्र येतात ते 'नर-मादी'. 'पुरूष आणि स्त्री'मध्ये काहीतरी भावबंध निर्माण व्हावे लागतात ! माझ्या दोस्तांनो, अफाट-अचाट-अफलातून माणूस होता आपला तुकोबाराया... खराखुरा संत. अस्सल समाजसुधारक. प्रतिभावान कवी ! जोपर्यन्त या पृथ्वीतलावर 'माणूस' आहे तोपर्यंत ही गाथा तरणार आहे.. माणसाला हिताचा मार्ग दाखवत रहाणार आहे.'

मुलगी झाली हो, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये किरण माने यांनी काम केलं आहे. तसेच बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Kiran Mane: 'तिला वाटलं आपला नातू बिघडला !...'; किरण माने यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Avdhoot Guptes Song On Vidyanand Bapat: 'हा धंदा विद्यानंदा...'; अस्खलित मराठी बोलणाऱ्या पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेचं गाणं, VIDEO
'हा धंदा विद्यानंदा...'; अस्खलित मराठी बोलणाऱ्या पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेचं गाणं, VIDEO
Suraj Chavan Blessed With Baby Girl: 'झापूक झुपूक' फेम सूरज चव्हाण बाबा झाला; घरी चिमुकल्या 'गुलिगत स्टार'चं आगमन; VIDEO VIRAL
'झापूक झुपूक' फेम सूरज चव्हाण बाबा झाला; घरी चिमुकल्या 'गुलिगत स्टार'चं आगमन; VIDEO VIRAL
Jahnavi Killekar On Bigg Boss Marathi: 'मला भांडताच येत नाही, 'बिग बॉस'च्या घरात जायचं नव्हतं...'; जान्हवी किल्लेकरचं भुवया उंचावणारं वक्तव्य
'मला भांडताच येत नाही, 'बिग बॉस'च्या घरात जायचं नव्हतं...'; जान्हवी किल्लेकरचं भुवया उंचावणारं वक्तव्य
Samir Choughule On Sachin Tendulkar: 'सचिन तेंडुलकरांसाठी मी उपवास केलेत...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा 'तो' किस्सा, क्रिकेटच्या देवाला पाहून ढसाढसा रडला अभिनेता
'सचिन तेंडुलकरांसाठी मी उपवास केलेत...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा 'तो' किस्सा, क्रिकेटच्या देवाला पाहून ढसाढसा रडला अभिनेता

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Mumbai Metro 3: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गाची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार
गुड न्यूज, गणेशोत्सवात मुंबई मेट्रो लाईन-३ची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, MMRC चा मोठा निर्णय  
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Embed widget