
Majhi Tujhi Reshimgath : नेहा-यशचं होणार ग्रॅंड वेडिंग; लवकरच पार पडणार साखरपुडा
Majhi Tujhi Reshimgath : नेहा-यशचं ग्रॅंड वेडिंगचे शूटिंग सिल्वासामध्ये होणार आहे.

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. सध्या मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. मालिकेत लवकरच यश-नेहाचा साखरपुडा पार पडणार आहे. तर नेहा-यशचं ग्रॅंड वेडिंग होणार आहे.
सिल्वासामध्ये शुट होणार नेहा-यशचं ग्रॅंड वेडिंग
यश-नेहाच्या ग्रॅंड वेडिंगचे शूटिंग सिल्वासामध्ये होणार आहे. हे मालिकाविश्वातलं 'तुला पाहते रे' नंतरचं सगळ्यात भव्य लग्न असणार आहे. यश-नेहाचा साखरपुडा नेहाच्या चाळीत होणार आहे. तर सिल्वासामध्ये शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. यश-नेहाच्या शाही विवाहसोहळ्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
यश-नेहाचा पार पडणार साखरपुडा
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत लवकरच यश-नेहाचा साखरपुडा पार पडणार आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत यश, परी आणि नेहा तिघेही दिसून येत आहेत. साखरपुड्यादरम्यान नेहा आणि यशने पारंपारिक लूक केलेला दिसून येत आहे.
View this post on Instagram
श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
नेहा मालिकेच्या सेटवर परतली
मालिकेत नेहाची भूमिका साकारणारी प्रार्थना बेहेरे तिच्या नवऱ्यासोबत लंडनला फिरायला गेली होती. त्यामुळे नेहा मालिकेत दिसणार नाही, असे म्हटले जात होते. पण प्रार्थना जरी लंडनला गेली असली तरी नेहा मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेत नेहा लंडनला गेलेली दाखवली असल्याने नेहा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून परीसोबत संवाद साधताना दिसून आली होती.
संबंधित बातम्या
Majhi Tujhi Reshimgath : अखेर आजोबांनी केला नेहा आणि परीचा स्वीकार; पार पडणार साखरपुडा
Phulala Sugandh Maticha : देशसेवेचं व्रत घेतलं हाती, कीर्तीचं ‘आयपीएस’ बनण्याचं स्वप्न अखेर झालं पूर्ण!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
