Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आजोबांची प्रकृती बिघडल्याने नेहा पॅलेसवर राहायला आली आहे. मालिकेच्या आगामी भागात नेहा पॅलेसवर गुढी पाडवा साजरा करताना दिसणार आहे. 


आजोबांच्या इच्छेखातर नेहा यशसोबत लग्न न करताच पॅलेसवर राहायला गेली आहे. त्यामुळे गुढी पाडवादेखील नेहा पॅलेसवरच साजरा करणार आहे. मालिकेच्या आगामी भागात नेहा आजोबांना विचारताना दिसणार आहे, पॅलेसवर गुढी पाडवा साजरा केला तर चालेल का? पॅलेसवर पहिल्यांदाच गुढी पाडवा साजरा होणार असल्याने यश आणि आजोबा खूप आनंदी झाले आहेत.





नेहामुळे यशच्या पॅलेसचे रुपांतर घरात होणार आहे. मालिकेत सध्या नेहा आणि यशला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.


संबंधित बातम्या


Tu Tevha Tashi : ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील चंदू चिमणे या आधीही झळकलाय छोट्या पडद्यावर!


Will Smith : ‘थप्पड’ प्रकरणानंतर विल स्मिथचं मोठं पाऊल, ऑस्कर अकादमीमधून राजीनामा!


Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने पारंपारिक पद्धतीने साजरा केला गुढी पाडवा, चाहत्यांना दिल्या नव वर्षाच्या शुभेच्छा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha