Tu Tevha Tashi : झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. सौरभ आणि अनामिकाच्या अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना आवडतेय. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना रंजक वाटत आहेत. सौरभ, अनामिका या प्रमुख व्यक्तिरेखांप्रमाणेच ‘पुष्पावल्ली’, ‘चंद्रलेखा’, ‘चंदू चिमणे’ या व्यक्तिरेखांवर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेतील सौरभचा मित्र ‘चंदू चिमणे’ याची भूमिका अभिनेता किरण भालेराव साकारत असून, त्याची विनोदी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतेय.


किरणचा चेहरा हा प्रेक्षकांच्या ओळखीचा आहे. अभिनेता किरण भालेराव हा 2009मध्ये गाजलेल्या ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’च्या पहिल्या पर्वाचा स्पर्धक होता. अभिनयाची आवड जोपासण्यासाठी किरणने त्याची नोकरी देखील सोडली. पण, त्याच्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे त्याने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. ‘तू तेव्हा तशी’मधील त्याने साकारलेला चंदू देखील प्रेक्षकांना आपल्यातलाच एक वाटतो, असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. 


स्वप्नील-शिल्पाच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती!


झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) या आगामी मालिकेची अगदी पहिल्या झलकेपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे. या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) ही जोडी पाहायला मिळते आहे. पहिल्या प्रेमाचं आपल्या आयुष्यात खूप खास स्थान असतं आणि त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात आयुष्यभर साठलेल्या असतात.


अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं असेल तर? अशाच अव्यक्त प्रेमाची गोष्ट म्हणजे ‘तू तेव्हा तशी’. ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि प्रेक्षकांची उत्सुकता द्विगुणित झाली. स्वप्नीलची ही नवी मालिका प्रदर्शित कधी होणार, याची आतुरता प्रेक्षकांना होतीचं, त्याचं उत्तर देखील मिळालं आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha