Will Smith : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता विल स्मिथचे (Will Smith) नाव चर्चेत आहे. 'द मेन इन ब्लॅक'चा अभिनेता विल स्मिथ खूप प्रसिद्ध आहे. विल स्मिथचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. लोक त्याच्या दमदार अभिनयाचे आणि चित्रपटांचे चाहते आहेत. पण, आजकाल तो त्याच्या अभिनयामुळे नाही तर, ऑस्करशी संबंधित वादामुळे चर्चेत आहे. दरम्यान, त्याच्याशी संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे, जी त्याच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे.


खरं तर, हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथ याने अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या सदस्यत्वाचा (Oscars 2022) राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आहे. ऑस्कर अवॉर्ड शोमध्ये होस्ट क्रिस रॉकला थप्पड मारल्यानंतर झालेल्या वादातून त्याने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. शुक्रवारी रात्री अभिनेता विल स्मिथनेही एक निवेदन जारी केले.



यामध्ये त्याने आपल्या कृत्याबद्दल सर्वांची माफी मागितली आहे. त्याने लिहिले की, 94व्या ऑस्कर सोहळ्यात मी जे काही केले ते लज्जास्पद, धक्कादायक होते. माझ्याकडून दुखावल्या गेलेल्या लोकांची यादी मोठी आहे आणि त्यात ख्रिस, त्याचे कुटुंब, माझे अनेक प्रिय मित्र आणि प्रियजनांचा समावेश आहे. याशिवाय जगभरातील असे प्रेक्षकही सामील आहेत, जे घरी बसून हा कार्यक्रम पाहत होते. असे सांगत त्याने अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसमधून राजीनामा देण्याची घोषणा केली.


ख्रिस रॉकला लगावली थप्पड!


2022 ऑस्कर अकादमी पुरस्कार सोहळ्यादरम्यान, हॉलिवूड अभिनेता विल स्मिथने त्याची पत्नी जाडाच्या आजारपणावर विनोद केल्याबद्दल कॉमेडियन ख्रिस रॉकला स्टेजवरच थप्पड मारली. या थप्पडचा आवाज मात्र जगभरात ऐकू आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. कॉमेडियन क्रिस रॉकला विलं कानाखाली मारल्यामुळे त्याला अटक करण्यासाठी पोलीस तयार होते.


‘विलला अकट करण्यासाठी आम्ही तयार आहोत. ख्रिस तुम्ही त्याच्यावर आरोप करू शकता’, असा पर्याय पोलीस ख्रिसला देत होते. पण ख्रिसनं विलवर आरोप केला नाही. तो म्हणाला की, मी ठिक आहे. लॉस अँजेलिसमधील पोलिसांनी ख्रिसला विचारले, 'तुम्हाला वाटतं का की, आम्ही कोणती कारवाई केली पाहिजे?' ख्रिसनं या प्रश्नाला ‘नाही’ असं उत्तर दिलं. लॉस अँजेलिसमधील पोलिसांनी रविवारी सांगितले की,'रॉकने तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता.'


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha