एक्स्प्लोर

Myra Vaikul : चिमुकल्या परीची शॉर्टफिल्ममध्ये एन्ट्री! चाहत्यांना म्हणतेय, ‘मी जर मोबाईल असते तर...’

Myra Vaikul : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या चिमुकल्या परीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आता ती एका शॉर्ट फिल्ममध्ये देखील झळकते आहे.

Myra Vaikul : विविध व्हिडीओच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहणारी, लहान वयातच सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असणारी चिमुरडी मायरा वायकुळ (Myra Vaikul) आता मोबाईल पोल्युशनवर मेसेज देण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या चिमुकल्या परीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आता ती एका शॉर्ट फिल्ममध्ये देखील झळकते आहे. मोबाईल पोल्युशनवर एक अतिशय समर्पक असणारी अशी काळजाचा ठाव घेणारी शॉर्टफिल्म गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या शॉर्टफिल्मचं प्रमुख आकर्षण आहे, तीची कन्सेप्ट आणि बालकलाकार मायरा वायकुळ. मायराची ही शॉर्टफिल्म अनेकांपर्यंत पोहोचावी म्हणून तिची निर्मिती मराठी, हिंदी आणि कन्नड अशा तीन भाषांमध्ये करण्यात आली आहे.

मोबाईलमुळे जग जवळ आलं असलं तरी, नात्यांमधला जिव्हाळा कुठेतरी हरवत चालला आहे. त्यामुळे 'सतर्क व्हा' असा इशारा करणारी ही फिल्म अगदी रोजच्या आयुष्यात घडणारा एक प्रसंग बोलक्या स्वरुपात घेऊन आली आहे.

काय आहे कथानक?

छोट्या अनूच्या (मायरा वायकुळ) पाचव्या वाढदिवसाचं जंगी आयोजन केलं जातं. पण, वाढदिवसाच्या दिवशी हजर असलेले नातेवाईक मोबाईलमध्ये व्यस्त असतात. एकमेकांच्या समोर असून सुद्धा मोबाईलच्या माध्यमातून कनेक्ट होतात. जेव्हा केक कापण्याची वेळ येते, तेव्हा तर सगळे मोबाईलला समोर धरून तो सोहळा शूट करतात. मात्र, अनूला हे काही नकोय.. तिला मोबाईलच्या माध्यमातून नात्यांशी जोडायचं नाहीय; तर माणसांच्या सहवासातून नात्यांच्या घट्ट बंधनात गुंफलं जायचंय. तिला मोठ्ठा केक नकोय, मोठाले गिफ्ट नकोयत, तर तिला हवाय आपल्या लोकांचा 'वेळ'.  या वेळेतूनच तिला हरवत चाललेली नाती जोडायची आहेत. तिला नात्यांमधला जीवंतपणा निर्माण करायचा आहे. यावेळी ती एक महत्त्वाचा संदेश देऊन जाते.

नात्यांमधील अंतर वाढण्याची भीती!

आजकाल सणासमारंभात सगळेच मान खाली घालून मोबाईलमध्ये अडकलेले दिसतात. अशीच परिस्थिती घराघरांतून दिसते. त्यामुळे अजाणतेपणी आलेले हे संकट पुढे नात्यांमध्ये आणि किती अंतर वाढवेल, या विचाराने मी डिस्टर्ब झालो. म्हणून हा मेसेज देणारी ही फिल्म आम्हाला करण्याची गरज भासली. मोबाईलच्या माध्यमातून आम्हाला आपल्याला Disconnect to Reconnect...हा महत्त्वाचा मेसेज देणं सोपं गेलं आहे. अद्भुत क्रिएटिव्हज आणि मायरा या दोघांनी आमच्या संकल्पनेला समाधानकारक स्वरूप दिलं आहे, असे निर्माते कौशिक मराठे म्हणाले.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 11 october : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget