![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtrachi Hasyajatra : रोहित शेट्टीची Cirkus रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात; रणवीर सिंह सादर करणार स्किट
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात 'सर्कस' सिनेमाची टीम हजेरी लावणार आहे.
![Maharashtrachi Hasyajatra : रोहित शेट्टीची Cirkus रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात; रणवीर सिंह सादर करणार स्किट Maharashtrachi Hasyajatra Rohit Shetty Cirkus will perform in Maharashtrachi Hasyajatra Ranveer Singh will present a skit Maharashtrachi Hasyajatra : रोहित शेट्टीची Cirkus रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात; रणवीर सिंह सादर करणार स्किट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/16/0327bf8826e90462e312d8d498ec98e91671181761371254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाही, तर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना प्रवासात नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत. हा कार्यक्रम आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून जगभरात प्रसिद्ध आहे. आता या कार्यक्रमात 'सर्कस' (Cirkus) सिनेमाची टीम हजेरी लावणार आहे.
प्रेक्षक 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाकडे निखळ मनोरंजनाचं साधन म्हणून पाहत असतो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे चाहते दिग्गज कलावंत आणि मोठी व्यक्तिमत्त्वं आहेत आणि अशा कलावंतांनी हास्यजत्रेत सहभाग घेतला आहे. आता बॉलिवूडच्या शिखरावर पोचलेला दिग्गज अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात स्किट सादर करणार आहे.
View this post on Instagram
समीर चौघुले, गौरव मोरे, शिवाली परब, दत्तू मोरे ही कलाकारमंडळी रणवीर सिंहसोबत स्कीट सादर करताना दिसणार आहेत. सोबत महाराष्ट्राचा एनर्जेटिक सुपरस्टार सिद्धार्थ जाधव देखील असेल. सर्कस सिनेमाचा चमू 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे.
विशेष म्हणजे ज्यावेळी सर्कस सिनेमाची शूटींग सुरु होती तेव्हापासूनच महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात जायचे अशी चर्चा कलाकारांमध्ये सुरू होती. शेवटी प्रदर्शनाची तारीख ठरली तेव्हा सगळ्या कलाकारांना महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात जाण्याची उत्सुकता होती, असे कलाकारांनी सांगितले. विशेष म्हणजे रणवीर सिंहने महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायला सुरवात केली आणि सलग दोन तास तो महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम पाहताना मंत्रमुग्ध झाला. त्याचा तो उत्साह आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्राच्या या भागात आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात रोहित शेट्टी, रणवीर सिंह, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडीस, वरुण शर्मा, सिद्धार्थ जाधव, अश्विनी काळसेकर आणि विजय पाटकर हे कलाकार उपस्थित असणार आहेत. रोहित शेट्टी यांची सर्कस हास्यजत्रेच्या मंचावर आल्याने मंचावर घडलेली धमाल पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. येत्या 19 आणि 20 डिसेंबरला सोनी मराठीवर रात्री 9 वाजता प्रेक्षकांना हा खास भाग पाहता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)