Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...


Me Honar Superstar Chhote Ustaad 2: सुरांची जुगलबंदी होणार, छोटे उस्ताद जादू करणार; 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' चा नवा प्रोमो पाहिलात?


Me Honar Superstar Chhote Ustaad 2: छोट्या पडद्यावरील  'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद-2' (Me Honar Superstar Chhote Ustaad) या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिझनचे परीक्षण सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), आदर्श शिंदे (Adarsh Shinde) आणि वैशाली सामंत (Vaishali Samant) हे करणार आहेत. नुकताच  'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद-2' या कार्यक्रमाचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमधील  सोहम ठाकरे आणि आर्या लोकरे यांच्या गाण्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Aai Kuthe Kay Karte : वीणा अनिरुद्धवर ठेवतेय विश्वास; पाहा 'आई कुठे काय करते !' मालिकेचा प्रोमो


 Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत काही दिवसांपूर्वी आशुतोषच्या मानलेल्या बहिणीची एन्ट्री झाली आहे. या बहिणीचं नाव वीणा असं आहे.  'आई कुठे काय करते' या  मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये वीणा ही अनिरुद्धवर विश्वास ठेवताना दिसत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tuzech Mi Geet Gaat Aahe: गुंडांनी पुन्हा मंजुळाला पकडून नेलं; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल


Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेत मोठा ट्वीस्ट येणार आहे. नुकताच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, गुंडांनी मंजुळाला पुन्हा पकडून नेलं आहे. आता मंजुळाची गुंडांपासून सुटका होईल की नाही? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे.


 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Aamhi Jato Amuchya Gava: 55 वर्षांपूर्वीचा ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ चित्रपट घरबसल्या पहाण्याची प्रेक्षकांना संधी; कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या...


Aamhi Jato Amuchya Gava: अनेक प्रेक्षकांना नव्या चित्रपटांबरोबरच जुने चित्रपट बघायला देखील आवडते. काही जुने चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात. आता 55 वर्षांपूर्वी रिलीज झालेला आम्ही जातो आमुच्या गावा (Aamhi Jato Amuchya Gava) हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच 18 मे रोजी  दुपारी  1  वाजता हा सिनेमा प्रवाह पिक्चरवर प्रेक्षकांना पहाता येणार आहे.


  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Khatron ke khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये पुन्हा दिसणार शिव ठाकरे अन् अब्दू रोजिकची जोडी? निर्मात्यांची 'छोटा भाईजान'ला विचारणा


Shiv Thakare Abdu Rozik On Khatron Ke Khiladi : बॉलिवूडचा लोकप्रिय सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13) या कार्यक्रमाची सध्या चर्चा आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू असून असून या पर्वात सहभागी होणारे स्पर्धक दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. आता खतरों के खिलाडी'च्या तेराव्या पर्वात शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अब्दू रोजिकची (Abdu Rozik) जोडी दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.


   सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा