Me Honar Superstar Chhote Ustaad 2: छोट्या पडद्यावरील  'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद-2' (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिझनचे परीक्षण सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), आदर्श शिंदे (Adarsh Shinde) आणि वैशाली सामंत (Vaishali Samant) हे करणार आहेत. सध्या 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद-2' या कार्यक्रमाचा  एक प्रोमो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये पिंपरी-चिंडवडची 11 वर्षांची आर्या लोकरे आणि 9 वर्षांचा अमरावतीचा सोहम ठाकरे  हे दोघे गाणं गाताना दिसत आहेत. 


नुकताच  'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद-2' या कार्यक्रमाचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमधील  सोहम ठाकरे आणि आर्या लोकरे यांच्या गाण्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 'सुरांची जुगलबंदी होणार, छोटे उस्ताद जादू करणार...' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


पाहा प्रोमो






'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' हा कार्यक्रम कधी सुरु होणार? 


'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) हा कार्यक्रम 10 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार ते रविवार रात्री 9 वाजता प्रेक्षक पाहू शकणार आहेत. आता 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' या कार्यक्रमात कोण-कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत? या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करणार आहे? या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.


'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' या कार्यक्रमाची विजेती शुद्धी कदम (Shuddhi Kadam) ही ठरली होती. या कार्यक्रमात  राजयोग धुरी,   सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली ठक या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या कार्यक्रमात विविध कलाकारांनी हजेरी लावली होती.  आता 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Me Honar Superstar Chhote Ustaad 2: छोटे उस्ताद गाणार, सुरांची जादू होणार; 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीस