Sheezan Khan On Khatron Ke Khiladi 13 : टीका आणि आरोपांनंतर पुन्हा करिअर घडवण्याची संधी खूप कमी मंडळींना मिळते. अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शीझान खान (Sheezan Khan) पोलिसांच्या ताब्यात होता. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शीझानला लगेचच 'खतरों के खिलाडी 13'साठी (Khatron Ke Khiladi 13) विचारणा झाली आहे. शीझान आता 'खतरों के खिलाडी 13'मध्ये स्टंट करताना दिसणार आहे. 


'खतरों के खिलाडी 13'चं (Khatron Ke Khiladi 13) शूटिंग सुरू झालं आहे. या पर्वात सहभागी होणारे सर्व स्पर्धक दक्षिण आफ्रिकेत पोहोचले आहेत. शीझान खानही दक्षिण आफ्रिकेत असून 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगला त्याने सुरुवात केली आहे. 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात शीझान खानही दिसत आहे. 


'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगसाठी शीझान दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यानंतर त्याने एक कूल फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"नवी सकाळ...नवी सुरुवात". तसेच त्याने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो कॉफी पिताना दिसत आहे. 






अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शीझान खानची तुरुंगातून सुटका झाली आणि लगेचच त्याला 'खतरों के खिलाडी 13'साठी विचारणा झाली. 'खतरों के खिलाडी 13'चं शूटिंग दक्षिण आफ्रिकेत होत असल्याने त्याला पासपोर्टची आवश्यकता होती. परदेशात जाण्यासाठी त्याने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. त्यानंतर वसई न्यायालयाने त्याला आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्ट परत दिला. आता शीजान खान 'खतरों के खिलाडी 13' च्या शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेत आहे.


तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली होती. तुनिषाच्या आत्महत्येला शीझान जबाबदार असल्याचा आरोप अभिनेत्रीच्या आईने केला होता. त्यानंतर अनेक दिवस तो तुरुंगात होता. आता 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) शीझान खान कसा खेळतो याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 


संबंधित बातम्या


Sheezan Khan : तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करायला शीझान खान सज्ज! रोहित शेट्टीच्या शोमध्ये होणार सहभागी