Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत काही दिवसांपूर्वी आशुतोषच्या मानलेल्या बहिणीची एन्ट्री झाली आहे. या बहिणीचं नाव वीणा असं आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये वीणा ही अनिरुद्धवर विश्वास ठेवताना दिसत आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, आशुतोष हा वीणाला म्हणतो, 'तुला जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण ट्रान्सफर ऑफ ओन्हरशिप करुयात. तू हे डॉक्युमेंट्स वाचून घे' त्यानंतर वीणा ही डॉक्युमेंट्स न वाचताच सही करते, तेवढ्यात अनिरुद्ध म्हणतो, कितीही जवळच नातं असलं तरी डॉक्युमेंट्स न वाचता घेतलेले निर्णय चांगले नसतात.'
अनिरुद्ध वीणाकडून डॉक्युमेंट्स घेतो. त्यानंतर अरुंधती वीणाला म्हणते, 'तू डॉक्युमेंट्स वाचणार आहेस ना मग ते तुझ्याकडेच ठेव'
पाहा प्रोमो:
'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभूलकर या साकरतात तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी हे साकारतात. तर संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
'आई कुठे काय करते' मालिकेत वीणाची एन्ट्री झाल्याने मालिकेत रंजक वळण आलं आहे. वीणाचा वापर करुन अनिरुद्ध आशुतोषच्या आणि अरुंधतीच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत आहे याचा अंदाज अरुंधतीला आला आहे. त्यामुळे वीणाच्या येण्याने अरुंधतीच्या आयुष्यात काय ट्विस्ट येणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेत आपल्या मुलांच्या सुखासाठी धडपडणाऱ्या आईच्या भूमिकेत मधुराणी दिसत आहे. मधुराणी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aai Kuthe Kay Karte : वीणा अरुंधतीला म्हणाली,"तू तीन मुलांची आई, अनिरुद्धसोबत 25 वर्षांचा संसार..."