Madhurani Prabhulkar Post : काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकले आहे. सध्या हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर चांगलाच धूमाकूळ घालताना दिसत आहे. सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा अजूनही सुरू आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला या सिनेमाचे प्रत्येक मराठी माणूस आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार कौतुक करत आहेत. अशातच 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरने चित्रपटाविषयी खूप कौतुक केले आहे. याचा खास व्हिडीओ तिने तिच्या सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.या व्हिडीओखाली तिने 'आई' कडून 'बाईपण ' ला ' भारी 'शुभेच्छा असे कॅप्शन लिहिले आहे.


या व्हिडीओत ती ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या टीमचे कौतुक करताना दिसत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांचे कौतुक देखील तिने भरभरून कौतुक केले आहे. तसेच जोरदार प्रमोशन आणि माउथ पब्लिसीटीमुळे या चित्रपटाने तब्बल  2.50 कोटी रूपयांची कमाई आत्तापर्यंत केली आहे. या चित्रपटाची सर्वात जास्त क्रेझ महिलावर्गात पाहायला मिळत आहे. 


काय आहे व्हिडीओ


"बाईपण भारी देवा’ या भारी चित्रपटाच्या टीमचं कौतुक करायला मी हा व्हिडीओ करत आहे. मी जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला होता, तेव्हा मी ठरवलं होतं की मला इतरांचं माहिती नाही, पण मी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहणार आहे. हे जसे मला वाटलं तसेच महाराष्ट्रातल्या तमाम बायकांना वाटले असणार म्हणून तर चित्रपटाला एवढे प्रेम मिळत आहे.


केदारसर तुमचे खूप खूप आभार. खूप सुंदर चित्रपट, फारच छान. तु्म्ही खूप चांगला चित्रपट आम्हाला दिलात. मला जिओ स्टुडिओ आणि निखिल साने यांच्या टीमचंही कौतुक करायचं आहे, कारण त्यांनी हा चित्रपट खूप उत्तम पद्धतीने प्रमोट केला आहे. त्याबरोबरच पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे की, चित्रपट चांगला असेल, त्याचे प्रमोशन उत्तम झाले, तो लोकापर्यंत पोहोचला गेला तर आजही मराठी माणूस एकत्रित जाऊन चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहे. अशा छान चित्रपटाची मराठी चित्रपटसृष्टीला गेले काही वर्षे गरज होती. जो तुम्ही दिलात, तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम असे ती म्हणाली आहे."


'आई कुठे काय करते' या मालिकेतून मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली आणि आज ती सर्व गृहीणींची लाडकी झाली आहे. तिच्या अरूंधती या पात्राची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते. या मालिकेत रोच नवे नवे ट्विस्ट येत असतात. आता देखील ही मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


IMDb: 2023 मधील आतापर्यंतचे सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपट अन् वेब सीरिज; IMDb कडून यादी जाहीर