Baipan Bhaari Deva: 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) या अभिनेत्रींनी प्रमुख भूमिका साकारली आहे. यामधील शिल्पा नवलकर या प्रसिद्ध लेखिका आहेत. अनेक हिट मालिकांचे संवाद लेखन केलं आहे. जाणून घेऊयात शिल्पा यांच्याबद्दल...


शिल्पा नवलकर यांनी ठरलं तर मग, मोलकरीण बाई या मालिकांचे संवाद लेखन केलं आहे. तसेच गुमनाम है कोई या नाटकाचे लिखाण देखील त्यांनी केलं आहे. शिल्पा नवलकर यांचे वडील प्रमोद नवलकर हे राजकारणात सक्रिय होते. तसेच ते लेखक देखील होते. शिल्पा नवलकर यांनी प्रमोद नवलकर यांच्याबाबात एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'भ्रमंती हा दिवाळी अंक त्यांनी लिहिला होता.  तसेच त्यांनी भटक्यांची भ्रमंती हा कॉलम त्यांनी एका दैनिकात 25 वर्ष लिहिला.'






शिल्पा नवलकर यांनी  'बाई पण भारी देवा' या चित्रपटात केतकी ही भूमिका साकारली आहे.  'बाई पण भारी देवा' या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शिल्पा नवलकर  यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 'शिल्पा आणि मी पहिल्यांदा एकत्र काम केलं ते "अजुनही चांदरात आहे" या मालिकेत. ती अभिनेत्री म्हणून सुरूवात करून कधी लेखक म्हणून स्थिरावली हे तीचं तीलाही समजत नसावं. माझ्या सोबतचा तीचा संबंध हा Tom and Jerry सारखाच.  बाईपण भारी देवा या सिनेमात ती केतकीच्या भूमिकेत दिसणार आहे. केतकीचे प्रॅाब्लेम वेगळे असले तरी "तोरा" अगदिच शिल्पा सारखा आहे. आज शिल्पा Tv दुनियेतील top ची लेखक आहे. नंबर वन सिरीयल "ठरलं तर मग" ह्याच्या लेखनात प्रचंड व्यस्त आहे.. पण सिनेमातली तीची भुमिका पाहून तुम्ही थक्क नक्कीच व्हाल!!! माझ्यामते तीने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मला आशा आहे की, तीचा माझ्या विषयीचा प्रेमातून येणारा तुच्छ पणा असाच अबाधित राहील. आणि आम्ही आयुष्यभर असेच प्रेमात राहू..'






 'बाई पण भारी देवा'  हा चित्रपट 30 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. एका रिपोर्टनुसार, 'बाईपण भारी देवा' या चित्रपटानं रिलीजच्या अकरा दिवसांत 29.05 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षक आणि सेलिब्रिटी या चित्रपटाचं कौतुक करत आहेत.


 


संबंधित बातम्या


Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवा हे सिनेमाचं नाव नव्हतं...'; केदार शिंदेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष, चित्रपटामधील कवितेबद्दल देखील दिली माहिती