Shashank Ketkar: अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. शशांक केतकर हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स बरोबरच त्याच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे देखील चर्चेत असतो. शशांकनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यापैकी एका नेटकऱ्याच्या कमेंटला शशांकनं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
शशांकनं बस स्टॉप जवळील काही बोर्डाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, आता मला खरं खरं सांगा… bus stop वर रांगेत चला हे सांगण्यासाठी पेंग्विन वापरायची काय गरज होती.' शशांकच्या या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे.
नेटकऱ्याची कमेंट
शशांकच्या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हे कॅज्युअली पोस्ट केलं असेल तर ठिक आहे. पण ही पोस्ट जर कोणाला पर्सनल अटॅक करायला केली असेल तर हे चांगलं नाही. तू एक चांगला कलाकार आहेस तुझं काम आम्ही एन्जोय करतो. पण असं पॉलिटीकल झालास तर तुला डोक्यावरुन खाली पाडायला प्रेक्षक मागे बघणार नाहीत. आम्ही प्रेक्षक जर एखाद्याला डोक्यावर घेऊ शकतो तर त्याला खाली पाडू देखील शकतो, हे लक्षात ठेव.'
शशांकचा रिप्लाय
शशांकनं नेटकऱ्याच्या कमेंटला रिप्लाय दिला, 'का बरं मला खाली पाडाल? मला आयडीया आवडली ही... आणि राजकारणी लोक जर फिल्म प्रोड्युस करु शकतात. फिल्म चांगली, वाईट यावर भाष्य करु शकतात तर मग कलाकार राजकारणावर का नाही बोलू शकत? आणि राहता राहिला या फलकाचा प्रश्न तर तो मी छापून घेतलेला नाही.'
शशांकनं गोष्ट एका पैठणीची, 31 दिवस या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर होणार सुन मी ह्या घरची, सुखाच्या सारिंनी हे मन बावरे या मालिकांमुळे शशांकला विशेष लोकप्रियता मिळाली. सध्या शशांकची मुरांबा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.शशांकच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या: