Baipan Bhaari Deva: 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षक आणि सेलिब्रिटी या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. 'बाई पण भारी देवा' या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यामातून त्यांनी या चित्रपटाच्या नावामागील एक खास स्टोरी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
केदार शिंदे यांची पोस्ट
केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिलं, ''बाई पण भारी देवा' हे सिनेमाचं नाव नव्हतं. त्याचं वर्किंग टायटल होतं "मंगळागौर". ते बदलण्याचा विचार जेव्हा आला तेव्हा, अजित भूरे यांनी सुचवलं की, गाण्याची कॅच लाइन जी आहे ती ठेवली तर? बाईपण भारी देवा याचं पुर्ण क्रेडिट वलय मुलगुंड या गीतकाराचं आहे. ते गाणं त्याने फारच अप्रतिम लिहिलं आहे. स्त्री केंद्रस्थानी ठेवून तिच्या भावभावना उत्तम मांडल्या आहेत. आणि ती शेवटची कविता!!! माझी मैत्रीण अश्विनी शेंडे बागवाडकर त्यावेळी मदतीला धावून आली. या सिनेमाचा शेवट वेगळा होता. पण मंगळागौर गाणं संपल्यावर एवढ्या उंचीवर गेल्यानंतर पुन्हा कुठला सीन करणं जड जाणार होतं. ही कवितेची आयडिया डोक्यात आली. संपुर्ण सिनेमाचा सार व्यक्त करणारी ती कविता अश्विनीने लिहिली. या प्रवासात असंख्य माणसं महत्वाची ठरली. कोटीची उड्डाणं करणारा हा सिनेमा तयार होताना ही मंडळी विसरून चालणार नाहीत.' केदार शिंदे यांच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
बाईपण भारी देवा चित्रपटामधील कलाकार
रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) या अभिनेत्रींनी बाईपण भारी देवा (Kedar Shinde) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या