Aai Kuthe Kay Karte:  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेमध्ये अनेक ट्वीस्ट येत असतात. नुकताच या मालिकेचा मालिकाचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अरुंधतीनं अनिरुद्धच्या कानशिलात लगावली आहे. 


आई कुठे काय करते या मालिकेच्या व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अनिरुद्ध म्हणतो, 'हा नितिन शहा, या माणसानं वीणाला छळलं आहे. या माणसाला मी धक्के मारुन घराबाहेर काढणार आहे.' अनिरुद्ध हा नितिनला जेव्हा घराबाहेर काढायला जातो, तेव्हा अरुंधती ही अनिरुद्धला कानशिलात लगावते. अरुंधती ही अनिरुद्धला म्हणते, 'एकाही नात्याचं पावित्र्य जपता आलं नाही, तुम्हाला आता इतरांच्या नात्यामध्ये विष कालवत आहात?'


आता नितिनला अनिरुद्ध हा घराबाहेर काढतो का? यासगळ्यावर वीणा ही अनिरुद्धला काय म्हणते? हे आई कुठे काय करते या मालिकेच्या  आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून आई कुठे काय करते या मालिकेत  हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळत आहे. अनिरुद्धचं आणि संजनाचं काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. तर वीणा आणि अनिरुद्ध यांची वाढती मैत्री पाहून आशुतोषला टेंशन आलं होतं.






अरुंधती आणि आशुतोषचं होतं भांडण


वीणा ही तिचा नवरा त्रास देत असल्यामुळे आशुतोषकडे आली आहे. याबाबत कोणालाही माहित नसतं. त्यानंतर वीणाचं सत्य समोर आल्याने घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आशुतोष अरुंधतीला म्हणतो की,"वीणाने तिच्या लग्नाचं आणि पतीचं सत्य कोणाला सांगू नको असं सांगितलं असलं तरी ते सर्वांपासून लपवून तू चुकीचं वागली आहेस". अरुंधतीनं आशुतोषला वीणाबाबत काहीही सांगितलं नसल्यानं त्याचं आणि अरुंधतीचं भांडण होतं.


आई कुठे काय करते मालिकेची स्टार कास्ट


आई कुठे काय करते या मालिकेमध्ये  मधुराणी प्रभुलकर या अरुंधती ही भूमिका साकारतात तर अनिरुद्ध देशमुख ही भूमिका अभिनेते  मिलिंद गवळी हे साकारतात. या मालिकेतील  संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीच्या दुसऱ्या संसारातही भांडणतंटा; 'या' कारणाने आशुतोषचा राग अनावर