एक्स्प्लोर
BIG BOSS MARATHI 2 | राजेश-रेशमनंतर बिग बॉसच्या घरात नवी प्रेमकहाणी?
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनच्या दुसऱ्या दिवसापासूनच या पराग आणि रुपाली यांची चांगली मैत्री झाली.

मुंबई : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये शेफ पराग कान्हेरे आणि अभिनेत्री रुपाली भोसले यांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची कुणकुण आता इतर स्पर्धकांनाही जाणवत आहे.
BIG BOSS MARATHI 2 | माझ्यामुळे मेघा धाडे विजेती, शिवानी सुर्वेच्या दाव्यावर मेघा म्हणते...
खरंतर बिग बॉस हा रिअॅलिटी शो भांडण, वाद, मैत्री, अफेअर या गोष्टींमुळे कायमच चर्चेत असतो. 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनमध्ये अभिनेता राजेश शृंगारपुरे आणि अभिनेत्री रेशम टिपणीस यांचं सूत जुळलं होतं. दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली. आता दुसऱ्या सीझनमध्येही नवी प्रेमकहाणी फुलताना दिसत आहे.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनच्या दुसऱ्या दिवसापासूनच या पराग आणि रुपाली यांची चांगली मैत्री झाली. गार्डनमध्ये बसून गप्पा मारताना रुपाली आणि परागने एकमेकांना आपला भूतकाळबाबत तसंच वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं. रुपाली नेलपॉलिश लावत गप्पा मारत असताना परागने ती बाटली हातात घेत रुपालीच्या पायांना नेलपॉलिशही लावून दिलं. शिवाय घरात रंगणाऱ्या टास्कमध्येही त्यांची केमिस्ट्री दिसून येते.
BIG BOSS MARATHI 2 | किशोरी शहाणे, वैशाली माडे, सुरेखा पुणेकर 'बिग बॉस'च्या घरात
त्यामुळे आता सीझन दोनमध्ये रुपाली भोसले आणि पराग कान्हेरे या दोघांची 'लव्हस्टोरी' सुरु होणार अशी कुजबूज घरातील सदस्यांमध्ये होऊ लागली आहे.

आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement