एक्स्प्लोर

Kon Honar Crorepati : रेणुका शहाणे आणि अमेय वाघ खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ; आज रंगणार विशेष भाग

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या आजच्या भागात रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि अमेय वाघ (Amey Wagh) हजेरी लावणार आहेत.

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या आजच्या विशेष भागात रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि अमेय वाघ (Amey Wagh) हजेरी लावणार आहेत. या विशेष भागाचा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

रेणुका शहाणे आणि अमेय वाघ 'कोण होणार करोडपती'चा खेळ मुक्तांगण मित्र फाउंडेशनसाठी खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात रेणुका शहाणे आणि अमेय वाघ यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. अमेयने सचिन खेडेकर यांच्यासोबत 'मुरांबा' हा सिनेमा केला आहे. तर दुसरीकडे रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर (sachin khedekar) यांनी 'सैलाब' या हिंदी मालिकेत काम केलं आहे. त्यामुळे मुरांबा आणि सैलाबच्या शूटिंगदरम्यानच्या आठवणी ताज्या होणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर अमेय साजिरी आणि त्याची पहिली भेट ते लग्नापर्यंतचा प्रवास सांगताना दिसणार आहे. आशुतोष राणांसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा रेणुका शहाणे चाहत्यांसोबत शेअर करणार आहेत. दरम्यान मुक्तांगण मित्रसाठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात रेणुका शहाणे आणि अमेय वाघ  किती रक्कम जिंकतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 

'कोण होणार करोडपती' टीआरपीच्या शर्यतीत पडलं मागे

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत मागे पडला आहे. या कार्यक्रमाला फक्त 0.7 रेटिंग मिळाले आहे. तर गेल्या आठवड्यात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या विशेष भागालाही 0.7 रेटिंग मिळाले आहे. गेल्या आठवड्याच्या विशेष भागात रंगभूमीचा हाऊसफुल सम्राट प्रशांत दामले (Prashant Damle) आणि उत्कृष्ट अभिनेत्री कविता लाड (Kavita Lad) यांनी हजेरी लावली होती. हा विशेष भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 

'मनासारखं जगायचं असेल तर आता मागे नाही राहायचं', असं म्हणत 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात प्रशांत दामले, कविता लाड, महेश मांजरेकर, शिवाजी साटम, परेश रावल, विजय केंकरे आणि सचिन आणि श्रिया पिळगावकर यांनी हजेरी लावली आहे.

कोण होणार करोडपती
विशेष भाग : 8 जुलै 
किती वाजता? रात्री 9 वाजता
कुठे पाहता येईल? सोनी मराठी

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपाती'मध्ये रंगभूमीचा हाऊसफुल सम्राट प्रशांत दामले आणि कविता लाड लावणार हजेरी; अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेसाठी खेळणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime News :  किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 15 March 2025TOP 70 | टॉप 70 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07.00 AM TOP Headlines 07.00 AM 15 March 2025शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime News :  किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
Embed widget