Kaun Banega Crorepati 15: आठवीत शिकणारा 13 वर्षीय मयंक केबीसीमध्ये जिंकलेल्या एक कोटींचा वापर कसा करणार? उत्तरानं वेधलं लक्ष
Kaun Banega Crorepati 15: केबीसीमध्ये जिंकलेल्या पैशाचे काय करणार? असा जेव्हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मयंकला विचारला. या प्रश्नाला मयंकनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
Kaun Banega Crorepati 15: छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती 15 (KBC 15) हा कार्यक्रम चर्चेत आहे. केबीसीच्या एका एपिसोडमध्ये हरियाणातील मयंकने आपल्या ज्ञानाने सर्वांना थक्क केले. मयंकने एक कोटी रुपये जिंकून इतिहास रचला आहे. एक कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेसोबतच त्याला एक आलिशान कारही मिळाली. एक कोटी जिंकल्यानंतर मयंक भावूक झाला. त्यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्याला शांत केले, अभिनंदन केले आणि मिठी मारली. मयंकचे आई-वडीलही खूप भावूक झाले.
जिंकलेल्या पैशांचं काय करणार मयंक? (Kaun Banega Crorepati 15)
केबीसीमध्ये जिंकलेल्या पैशाचे काय करणार? असा जेव्हा अमिताभ बच्चन यांनी मयंकला विचारला. अमिताभ मयंकला म्हणाले, "तू करोडपती झाला आहेस. आता तू सांगा तू या पैशाचं काय करणार?" यावर मयंक म्हणतो, "हे पैसे मी माझ्या पालकांना समर्पित करणार असून भविष्यात उच्च शिक्षणासाठी वापरणार आहे." मयंकचे हे बोलणे ऐकून अमिताभ टाळ्या वाजवतात. अमिताभ यांनी शोमध्ये मयंकला हाय फाइव्ह दिले होते. मयंक आठवीत शिकतो. मयंकचे वडील दिल्ली पोलिसात हेड कॉन्स्टेबल आहेत.
View this post on Instagram
एक कोटींसाठी विचारण्यात आलेला प्रश्न
मयंकला एक कोटींसाठी विचारण्या आलेला प्रश्न -
ज्या नकाशात नव्याने सापडलेल्या मालदीवचे नाव 'अमेरिका' होते तो नकाशा बनवण्याचे श्रेय कोणत्या युरोपियन कार्टोग्राफरला दिले जाते? पर्याय होते- A- अब्राहम आर्टेलियस, B- गेरार्डस मर्केटर, C- जिओव्हानी बॅटिस्टा ऍग्रीसी, D- मार्टिन वाल्डसीमुलर. या प्रश्नाचे उत्तर होते- डी- मार्टिन वाल्डसीमुलर. ज्याला मयंकने अचूक उत्तर दिले. मयंकने 7 कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनीदेखील मयंकची दखल घेतली आहे. मयंक 'कौन बनेगा करोडपती ज्युनियर'मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने एक कोटी रुपये आपल्या नावे केले आहेत.
अमिताभ बच्चन 2000 मध्ये पहिल्या सीझनपासून कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) हा शो होस्ट करत आहेत. विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. केबीसीची (KBC) सुरुवात 2000 साली झाली. या कार्यक्रमाचे 14 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले.
संबंधित बातम्या: